घरIPL 2020IPL 2020 : रोहित फिट असणे, भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी - गावस्कर

IPL 2020 : रोहित फिट असणे, भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी – गावस्कर

Subscribe

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहितचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले.   

भारतीय पुरुष क्रिकेट संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही संघांची घोषणा झाली. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा तिन्ही संघांमध्ये समावेश नव्हता. रोहितला १८ ऑक्टोबरला झालेल्या पंजाबविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या चार सामन्यांना मुकला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर नसतानाही त्याला भारतीय संघात स्थान का मिळाले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, रोहित फिट असणे ही भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी असल्याचे सुनील गावस्कर यांना वाटते.

रोहितच्या दुखापतीबाबत अधिक स्पष्टीकरण दिले जाणे गरजेचे होते. मात्र, ते सोडता, रोहित शर्मा फिट असणे ही भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची गोष्ट आहे, असे गावस्कर म्हणाले. रोहितने काळजी घेत मैदानात परतण्याची घाई करणे टाळले पाहिजे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना, तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला वाटत होते. याविषयी गावस्कर यांनी सांगितले, रोहितला पुन्हा दुखापत होऊ नये आणि झालेली दुखापत वाढू नये असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी काळजी दाखवणे स्वाभाविकच आहे. मात्र, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित दुखापतीबाबत घाबरलेला वाटला नाही. त्याने सीमारेषेवर, तसेच ३० यार्डच्या वर्तुळातही क्षेत्ररक्षण केले. ‘मी पूर्णपणे फिट आहे,’ हे दाखवण्यासाठीच रोहित या सामन्यात खेळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -