घरक्रीडाखेळाडूंना प्रेक्षकांची गरज असतेच असे नाही!

खेळाडूंना प्रेक्षकांची गरज असतेच असे नाही!

Subscribe

खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेक्षकांची गरज असतेच असे नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी व्यक्त केले. जगभरात करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोनाचा फटका खेळांनाही बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच काही स्पर्धांचे सामने बंद स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना खेळवण्यात येत आहेत. नुकताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर प्रेक्षकांविना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी जिंकला. त्यानंतर मात्र तीन सामन्यांची ही मालिका रद्द करण्यात आली.

माझ्या मते, खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेक्षकांची गरज असतेच असे नाही. सामना चुरशीचा होत असेल तर तुम्ही आपोआपच तुमचा खेळ उंचावता. मात्र, चौकार-षटकार मारल्यानंतर किंवा चांगली कामगिरी केल्यानंतर प्रेक्षक जोरात ओरडतात आणि सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात या गोष्टीची कमी नक्कीच जाणवली. परंतु, प्रेक्षकांविना सामना झाल्याने स्टेडियममध्ये कसल्याही घोषणा होत नव्हत्या. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार ऐकू शकत होतात आणि अशाप्रकारे क्रिकेट पाहताना मजा आली, असे चॅपल म्हणाले.

- Advertisement -

दोन महायुद्धांची आठवण झाली!
मागील काही दिवसांतील घडामोडींमुळे इयन चॅपल यांना दोन महायुद्धांची आठवण झाली. क्रिकेट सामने फार क्वचितच रद्द केले जातात. आताच्या परिस्थितीमुळे मला दोन महायुद्धांच्या अवघड काळाची आठवण झाली. पहिल्या महायुद्धामुळे १९१४ सालच्या सुरुवातीला कसोटी सामने रद्द करण्यात आले होते आणि ते पुन्हा सुरु होण्यासाठी १९२० साल उजाडले. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हा काळ अधिकच वाढला. त्यावेळी ऑगस्ट १९३९ ते मार्च १९४६ या कालावधीत सामने झाले नव्हते, असे चॅपल यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -