घरक्रीडाटेबल टेनिसपटू मनिकाने ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

टेबल टेनिसपटू मनिकाने ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

Subscribe

भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने शनिवारी ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने शनिवारी ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. मनिका बत्रा जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या आणि तीन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या हिना हयाता विरुद्धचा कांस्यपदक सामना ४-२ ने जिंकला. (ITTF-ATTU Asian Cup table tennis tournament Manika Batra becomes first female Indian paddler to clinch bronze)

या सामन्यात मनिका बात्राने प्रतिस्पर्ध्याला ११-६, ६-११, ११-७, १२-१०, ४-११, ११-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला मीमा इटोकडून २-४ (८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११) असा पराभव पत्करावा लागला होता. तिला हरवल्यानंतरही तिने कांस्यपदकाच्या सामन्यात खेळून बक्षीस पटकावले.

- Advertisement -

थायलंडमधील बँकॉक येथे आशियाई चषक 2022 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गुरुवारी मनिका बत्रा हिने जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन झिंगटोंगवर विजय मिळवण्यासाठी जबरदस्त केळी केली होती.

हुआमार्क इनडोअर स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत ४४व्या क्रमांकावर असलेल्या बात्राने चौथ्या मानांकित टेबल टेनिसपटूचा ४-३ (८-११, ११-९, ११-६, ११-६, ९-११, ८-११, ११-) असा पराभव केला.

- Advertisement -

यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली. क्यूएफमध्ये तिने तैवानच्या चेन स्झु-यूचा ४-३ (६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९) असा पराभव करून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली.


हेही वाचा – BCCIच्या निवड समितीच्या प्रमुख पदासाठी अजित आगरकरचे नाव आघाडीवर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -