घरक्रीडाआयसीसीच्या कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा गोलंदाज जेम्स ॲंडरसन अव्वल

आयसीसीच्या कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा गोलंदाज जेम्स ॲंडरसन अव्वल

Subscribe

अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) कसोटीमधील गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या या क्रमवारीनुसार कसोटीमधील टॉप-10 गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा 40 वर्षीय गोलंदाज जेम्स ॲंडरसन अव्वल ठरला आहे. तब्बल 866 गुणांसह जेम्स अँडरसनने पहिले स्थान पटकावले आहे.

अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) कसोटीमधील (ICC Test Ranking) गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या या क्रमवारीनुसार कसोटीमधील टॉप-10 गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा 40 वर्षीय गोलंदाज जेम्स ॲंडरसन अव्वल ठरला आहे. तब्बल 866 गुणांसह जेम्स अँडरसनने (James Anderson) पहिले स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या टॉप-10 गोलंदाजांच्या यादीमध्ये 3 भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.

आयसीसीच्या गोलंदाजांच्या नव्या क्रमवारीनुसार पहिल्या स्थानावर जेम्स अँडरसन आहे. भारतीय संघातील फिरकीपटू आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे पाचव्या आणि नवव्या स्थानी आहेत. (James Anderson is the new no 1 test bowler in the world breaks the 87 year old record in cricket history)

- Advertisement -

या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची घसरण झाली आहे. पॅट कमिन्सची पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत केलेल्या अप्रतिम कामगिरीचा जेम्स अँडरसन याला फायदा झाला आहे. तसेच, आर. अश्विन याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.

40 वर्षीय अँडरसनने पॅट कमिन्सच्या 1466 दिवसांच्या अव्वल स्थानाला हादरा दिला आहे. तसेच, सर्वाधिक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. जेम्स अँडरसनने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात 7 बळी घेतले.

- Advertisement -

टॉप-10 गोलंदाज

  • जेम्स अँडरसन: इंग्लंड – 866 गुण
  • आर अश्विन: भारत – 864 गुण
  • पॅट कमिन्स: ऑस्ट्रेलिया – 858 गुण
  • ओली रोबिन्सन: इंग्लंड -820 गुण
  • जसप्रीत बुमराह: भारत – 795 गुण
  • शाहीन आफ्रिदी: पाकिस्तान – 787 गुण
  • कगिसो रबाडा: दक्षिण आफ्रिका – 776 गुण
  • काइल जेमिसन: न्यूझीलंड – 765 गुण
  • रवींद्र जडेजा: भारत – 763 गुण
  • मिचेल स्टार्क: ऑस्ट्रेलिया – 735 गुण

हेही वाचा – Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झाचा कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात पराभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -