इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात नॉटिंघममध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) इतिहास रचला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जेम्स अंडरसनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याला त्रिफळाचीत केले.

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात नॉटिंघममध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) इतिहास रचला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जेम्स अंडरसनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याला त्रिफळाचीत केले. या विकेटसह १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ६५० विकेट घेणारा अँडरसन पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. (james anderson made history as first fast bowler to took 650 test wicket)

कसोटी (Test Match) सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्यापुढे शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहेत. मुरलीधरनच्या नावावर १३३ टेस्टमध्ये ८०० विकेट आणि वॉर्नच्या नावावर १४५ टेस्टमध्ये ७०८ विकेट आहेत.

हेही वाचा – भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

जेम्स अंडरसननंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आहे. मॅकग्राने १२४ कसोटीमध्ये ५६३ विकेट घेतल्या होत्या. मॅकग्राचे हे रेकॉर्ड अंडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड तोडण्याच्या मार्गावर आहे. ब्रॉडने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये ५४३ विकेट आहेत.

अंडरसनने लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या सामन्यात अंडरसनने ६ विकेट घेतल्या होत्या. अंडरसनने कसोटी करियरमध्ये आतापर्यंत ३१ वेळा ५ आणि ३ वेळा १० विकेट घेतल्या आहेत.

याशिवाय, जेम्स अँडरसन इंग्लंडकडून ४००, ५००, ६०० आणि ६५० विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. अलीकडेच एशेस मालिका संपल्यानंतर अँडरसनला संघाबाहेर करण्यात आलं होतं. पण स्टोक्सने नेतृत्व स्वीकारताच अँडरसनचा कसोटी संघात समावेश झाला.


हेही वाचा – वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क लावून खेळले सामना, प्रेक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा