FIFA विश्वचषक 2022 : ग्रुप Eच्या जपानने 2-1 ने केले जर्मनीला पराभूत

FIFA विश्वचषक 2022च्या सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. आज बुधवारी जपानने ग्रुप E च्या सामन्यात जर्मनीला 2-1 ने पराभूत केले. जर्मनीच्या संघाने 33व्या मिनिटाला पेनल्टी मिळवून पहिला गोल केला. पण दुसऱ्या हाफमध्ये जपानने जोरदार पुनरागमन करत बरोबरी साधली.

FIFA विश्वचषक 2022च्या सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. आज बुधवारी जपानने ग्रुप E च्या सामन्यात जर्मनीला 2-1 ने पराभूत केले. जर्मनीच्या संघाने 33व्या मिनिटाला पेनल्टी मिळवून पहिला गोल केला. पण दुसऱ्या हाफमध्ये जपानने जोरदार पुनरागमन करत बरोबरी साधली. त्यानंतरर 83 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत आघाडी घेतली. तसेच, ही आघाडी जपानने अंतिम शिटीपर्यंत रोखली आणि सामन्यात विजय मिळवला. (japan beats germany by 2 1 in fifa world cup 2022)

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या दिवशीचा दुसरा सामना जर्मनी विरूध्द जपान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात २०१४ सालच्या विश्वविजेत्या जर्मनीचा जपाने २-१ ने पराभव केला. जर्मनीचा पराभव करत फुलबॉल विश्वचषक स्पर्धेत जपानने विजयी सलामी दिली.

पहिल्या गोलनंतर जर्मनीने जपानवर अनेक चढाया केल्या. यावर कडव्या जपानदेखील जर्मनीच्या चढायांनी प्रतिकार करत चांगला बचावात्मक खेळ केला. सामन्याच्या पहिल्या हाफ मध्ये जर्मन संघाने जपानच्या गोलपोस्टवर एकूण १५ शॉट मारले त्यापैकी ५ शॉट टार्गेटवर होते. इतक्या चढाया करूनही बलाढ्य जर्मनीला जपानविरूध्द एकही मैदानी गोल करता आले नाही. यावेळी जपानच्या बचावपटूंनी जर्मनीच्या आघाडी फळीतील खेळाडूंना चांगलीच झुंज देत संघासाठी अप्रतिम कामगिरी केली.

जपान आणि जर्मनी यांच्यात झालेल्या सामन्यात इल्के गुंडोगनने सामन्यात स्कोअरिंगची सुरुवात केली. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. ई गटातील या पहिल्या सामन्यात जर्मन संघाने अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. पूर्वार्धातच जर्मनीने आपल्या जोरदार आक्रमणाची झलक दाखवत चांगली खेळी केली. पण, जपानच्या बचावफळीने चांगली कामगिरी केली. 33व्या मिनिटाला जपानने पेनल्टी दिली, जी जर्मनीच्या इल्के गुंडोएनने गोलमध्ये बदलली.

दरम्यान, दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाविरुद्ध सौदी अरेबियाने मंगळवारी 2-1 असा विजय मिळवला. या उलटफेरीने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कतारची येथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम मोठी गर्दी होती. काल अर्जेंटिनाचा ज्या प्रकारे पराभव झाला त्याच प्रकारे आज पराभव झाला.


हेही वाचा – भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल