CORONA VIRUS: ऑलिम्पिक पुढे ढकलण्यास जपानचा नकार

हेलेनिक ऑलिम्पिक समितीने १९ मार्चलाच फ्लेमिंग सेरेमनी होणार असं स्पष्ट केलं आहे.

olympic 2020
CORONA VIRUS: ऑलिम्पिक पुढे ढकलण्यास जपानचा नकार

करोना जगभर फोफावत असताना याचा फटका खेळांना देखील बसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल आदींच्या सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, २४ जुलैपासून जपानमध्ये सुरु होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यास जपान नकास दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी असे म्हटले होते. मात्र, जपानचे ऑलिम्पिक मंत्री सेइको हॅशिमोटो यांनी नकार दिला आहे.


हेही वाचा – वापरलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता, निलेश साबळेचा माफीनामा !


हेलेनिक ऑलिम्पिक समितीने १९ मार्चलाच फ्लेमिंग सेरेमनी होणार असे स्पष्ट केले. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे जपानने म्हटले आहे. जपानमध्ये आतापर्यंत करोनाची ७१६ प्रकरणे आहेत. तर करोनाने २१ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑलिम्पिक रद्द झाली तर अब्जावधीचे नुकसान होईल या भीतीने स्पर्धा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे.