नवी दिली : गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीत बुमराह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजते आहे. तो सध्या जगातील नंबर एकच्या गोलंदाजांमध्ये मोडतो. अनेक दिगाज खेळाडूंनी त्याची तुलना इतर दिग्गजांशी केली आहे. अशामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका माजी क्रिकेटपटूने तर त्याची तुलना ही पाकिस्तानचा माजी गोलंदाज वासिम अक्रमशी केली आहे. “‘जसप्रीत बुमराह उजव्या हाताचा वसीम अक्रम आहे, त्याचा सामना करणे म्हणजे एक भयानक स्वप्न आहे,” असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जस्टिन लँगरने केले आहे. (Jasprit bumrah and wasim akram comparison by australian ex cricketer)
हेही वाचा : R Ashwin : भारतीय फिरकीपटू आर अश्विन निवृत्त; शेवटच्या सामन्यात झाला भावूक
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक जस्टिन लँगरने जसप्रीत बुमराहची तुलना वसीम अक्रमशी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या एका कसोटी सामन्यापूर्वी लँगरने बुमराहचे कौतुक केले होते. तो म्हणाला की, “भारतीय वेगवान गोलंदाज बूमराहचा सामना करणे हे फलंदाजांसाठी एक भयानक स्वप्न असते.” बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार कामगिरीने बुमराह हाहाकार माजवत आहे. 21 विकेट्ससह बुमराह विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कपेक्षा 7 विकेट्स जास्त घेतल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 25.14 राहिला असून तो इतर गोलंदाजांच्या तुलनेत खूपच चांगला आहे.
जस्टिन लँगर म्हणाला की, मला त्याचा सामना करणे अजिबात आवडत नाही. तो वसीम अक्रमसारखा आहे. माझ्यासाठी तो उजव्या हाताचा वसीम अक्रमच आहे. प्रत्येक वेळी मला तुम्ही सामना केलेला सर्वोत्तम फलंदाज असे विचारले जाते. खेळलेला सर्वोत्तम गोलंदाज कोण आहे?, मग मी म्हणतो, वसीम अक्रम, असे म्हणत त्याने तुलना केली. तो पुढे म्हणाला की, त्याच्याकडे चांगली गती आहे. तसेच, अनेक महान गोलंदाज प्रत्येक वेळी त्याच जागी चेंडू टाकतात. तर, त्याच्याकडे चांगला बाउन्सरदेखील आहे. त्यात विशेष म्हणजे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. वासिम अक्रमही अशीच गोलंदाजी करत होता.” असे त्याने सांगितले.