Homeक्रीडाJasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नव्या विक्रमाला गवसणी; दिग्गज गोलंदाजांना टाकलं मागे

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नव्या विक्रमाला गवसणी; दिग्गज गोलंदाजांना टाकलं मागे

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बोर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघाकडून अतितटीची खेळी पाहायला मिळत आहे. अशात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बोर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघाकडून अतितटीची खेळी पाहायला मिळत आहे. अशात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका डावात 5 विकेट्स घेत बुमराह याने 13 व्यांदा ही कामगिरी केली. बुमराह आतापर्यंत 44 कसोटी सामने खेळला असून त्यात 203 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने अनेक दिग्गज गोलंदाजाना मागे टाकले आहे. (Jasprit Bumrah Claims 5 Wickets For The 13th Time Breaks Pakistan Bawler Shoaib Akhtars Record)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो आहे. मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने 57 धावांत 5 बळी घेतले. या कसोटीत त्याने एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. या कसोटी मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने 30 विकेट घेतल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली 5 सामन्यांची कसोटी मालिका ही सध्या १-१ अशा बरोबरीत आहे.

- Advertisement -

एका डावात 5 वेळा विकेट घेण्याची कामगिरी बुमराहने 13 वेळा केली आहे. त्यामुळे त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर, श्रीलंकेचा माजी गोलंदाज चमिंडा वास आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन यांसारख्या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे

दरम्यान, 2018 मध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्येही त्याने 9 विकेट घेतल्या होत्या. ब्रिस्बेनच्या मैदानावर झालेल्या याच कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बुमराहने 9 विकेट्स घेतल्या होत्या.

- Advertisement -

जसप्रीत बुमराहची कसोटी कारकीर्द

  • सामने – 44
  • विकेट – 203
  • एका डावातील सर्वोत्तम कामगिरी – 27 धावांत 6 विकेट
  • सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी – 86 धावांत 9 विकेट
  • एका डावात 5 विकेट – 13 वेळा

हेही वाचा – Koneru Humpy : डी गुकेशनंतर चेसमध्ये कोनेरू हम्पीने रचला इतिहास; केली ही कामगिरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -