नवी दिल्ली : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 4 कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तसेच, तो गेल्या काही दिवसापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. असे असताना नुकतेच 2025 च्या पहिल्याच दिवशी आयसीसीने एक नवीन यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुमराहच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली. (Jasprit Bumrah created history in ICC Rankings)
हेही वाचा : ICC Ranking : आयसीसी क्रमवारीत कोहली-रोहितची घसरगुंडी; खराब फॉर्ममुळे नुकसान
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर मालिकेतील मेलबर्न कसोटीत 9 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर आता आयसीसीच्या नव्या यादीतही तो अव्वल स्थानावर कायम आहे. पण त्यासोबतच त्याने एक नखी एक कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या नावावर 907 गुण जमा झाले आहेत. यासोबत तो आयसीसी क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च गुण मिळवणारा भारतीय कसोटी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला कसोटी क्रमवारीत इतके गुण मिळवता आले नव्हते. जसप्रीत बुमराहच्या आर अश्विन हा आयसीसी क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय कसोटी गोलंदाज होता. बुमराहने मागील क्रमवारीत आर अश्विनची बरोबरी केली होती. मात्र, यावेळी त्याने अश्विनला मागे टाकले आहे. अश्विनने डिसेंबर 2016 मध्ये सर्वोच्च 904 गुणांचा आकडा गाठला होता.
2024 मध्ये केली अशी कामगिरी
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2024 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. यावर्षी झालेल्या 13 कसोटी सामन्यात त्याने 14.92च्या सरासरीने आणि 30.16 च्या स्ट्राइक रेटने 71 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याच्या कामगिरीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही त्याला सन्मानित केले आहे. यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2024 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला, यामध्ये दोन भारतीय खेळाडूंनी स्थान देण्यात आले. यात भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालचा समावेश आहे. दरम्यान, या संघाचा कर्णधार म्हणूनदेखील बुमराहची निवड केली आहे.