Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे दमदार कमबॅक; भारतासमोर 140 धावांचे आव्हान

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे दमदार कमबॅक; भारतासमोर 140 धावांचे आव्हान

Subscribe

Jasprit Bumrah : भारत आणि आयर्लंड यांच्यात डब्लिन येथे पहिला टी-20 सामना सुरू आहे. जयप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुनरागमनानंतर पहिल्याच षटकात त्याने 2 विकेट घेत आयर्लंडला अडचणीत आणले आणि दमदार कमबॅक केले आहे. (Jasprit Bumrahs powerful comeback 140 runs challenge in front of India)

हेही वाचा – India VS Pakistan : शोएब अख्तरची भविष्यवाणी, म्हणाला आगामी विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवेल

- Advertisement -

दुखापतीनंतर 11 महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करणारा जयप्रती बुमराह भारताच्या डावातील पहिले षटक टाकायला आला. आयर्लंडकडून अँड्रयू बालबर्नी आणि कर्णधार पॉल स्टर्लिंग ही सलामी जोडी मैदानात आली. बुमराहने टाकलेल्या पहिल्या चेंडूंवर अँड्रयूने चौकार मारला. मात्र दुसऱ्याच चेंडूंवर त्रिफळाचीत करत बुमराहने दमदार कमबॅक केले. त्याने टाकलेले इन स्विंग खेळण्यास अँड्रयू असमर्थ ठरला आणि त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूंवर बुमराहने लॉर्कन टकर याला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. टकर आपले खातेही उघडू शकला नाही.

- Advertisement -

यानंतर हॅरी टेक्टर (9) आणि पॉल स्टर्लिंग (11) हेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे सुरुवातीच्या 6 षटकांनंतर आयर्लंडने 30 धावांत आपल्या 4 विकेट गमावल्या होत्या. खराब सुरुवातीनंतरही आयर्लंडच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या अनुभवी जॉर्ज डॉकरेलला केवळ 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर मार्क एडेअर 16 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यामुळे आयर्लंड संघाने 10.3 षटकात 59 धावा करताना आपल्या 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्टिस कॅम्फर आणि बॅरी मॅककार्थी यांच्यात उपयुक्त भागीदारी पार पडली.

हेही वाचा – Asia Cup 2023 : लोकेश राहुलला संधी देऊ नका; भारताच्या माजी प्रशिक्षकाचा विरोध

आयर्लंड संघ अडचणीत असताना मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्टिस कॅम्फरने शानदार फलंदाजी केली. त्याला दुसऱ्या टोकाला मॅकार्थीने चांगली साथ दिली. त्यामुळे सहाव्या विकेटसाठी दोघांनी 57 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. चांगली फलंदाजी करणाऱ्या कॅम्फरने 33 चेंडूत 39 धावा करून बाद झाला तर, मॅककार्थीने 33 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. त्यामुळे आयर्लंड संघाने निर्धारीत 20 षटकात भारताला 140 धावांचे आव्हान दिले.

भारताकडून पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 8 च्या इकॉनॉमी रेटने निर्धारती 4 षटकात 32 धावा देत 2 विकेट घेतल्या. याशिवाय रवी बिश्नोई आणि जयप्रीत बुमराहला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या तर, अर्शदीपर सिंगला 1 विकेट मिळाली.

- Advertisment -