घरक्रीडाजसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपमधून बाहेर; शेवटची आशाही संपुष्टात

जसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपमधून बाहेर; शेवटची आशाही संपुष्टात

Subscribe

पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीला बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T 20I मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर आता पुन्हा तो खेळणार नसल्याचं समजतंय. बीसीसीआय लवकरच वर्ल्ड कपसाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : अखेर जे होऊ नये असे वाटत होते, अखेर तेच घडले आहे. जसप्रीत बुमराह T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला आहे. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या जबाबदाऱ्यांच्या वक्तव्यानंतर चाहत्यांना बुमराहकडून काही तरी चमत्काराची अपेक्षा होती, परंतु भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी तो संघात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीचे तपशीलवार मूल्यांकन केल्यानंतर आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर जस्सीला विश्वचषक खेळण्यासाठी अयोग्य घोषित केलेय. पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीला बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T 20 मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर आता पुन्हा तो खेळणार नसल्याचं समजतंय. बीसीसीआय लवकरच वर्ल्ड कपसाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. टीम इंडियाला आशिया चषकात पाकिस्तानकडून आणि त्यानंतर सुपर-4 मध्ये श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. बुमराह न खेळणे हे यामागे मोठे कारण होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध परतताना त्याने अचूक यॉर्कर मारत अॅरॉन फिंचला बोल्ड केले. दुखापत होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात 6 फलंदाजांना मैदानातून घरी पाठवले होते.

बुमराह 2019 नंतरही दुखापतग्रस्त
तसं पाहिलं तर जसप्रीत बुमराहला दुखापतीचा मोठा इतिहास आहे. खरं तर 2019 पासून तो अनेकदा जखमी झाला. गेल्या 3 वर्षात तो 6 दुखापतींसह कोणत्या न कोणत्या कारणाने टीम इंडियातून बाहेर होता. यात पाठीच्या 3 दुखापती झाल्यात. 2022 बद्दल बोलायचे झाल्यास तो टीम इंडियासाठी फक्त 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला आहे. जसप्रीत बुमराहने यावर्षी 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावलेत. हे भारताच्या विश्वचषक संघातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये बुमराहने मुंबईसाठी 14 सामने खेळले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -