विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर 2022च्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंचा समावेश

विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर 2022च्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये भारताच्या दोन स्टार खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांना विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर २०२२च्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर 2022च्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये भारताच्या दोन स्टार खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांना विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर २०२२च्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. एकाच वर्षात विस्डनचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्या दोन खेळाडूंना मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांच्यासह न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन व दक्षिण आफ्रिकेची डॅन व्हॅन निएकर्क यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला पुरुष क्रिकेटपटूंमधील, तर आफ्रिकेची लिएली ली हिला महिला क्रिकेटपटूंधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये हा मान पटकावला.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेत जसप्रीत बुमराहने कमालीची कामगिरी केली होती. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी विजयात बुमराहने गोलंदाजी व फलंदाजीतही योगदान दिले होते. ओव्हलमध्ये त्याने मॅच विनिंग कामगिरी केली होती. त्यामुळे भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील उर्वरित कसोटी येत्या जुलैमध्ये खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंडचा कॉनवे याने कसोटी पदार्पणात इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्याच फलंदाजाचा मान पटकावला होता. त्याशिवाय, एडबेस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात 29 वर्षीय खेळाडूने ८० धावांची खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता. तब्बल 22 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

रॉबिन्सन हा २०२१ मध्ये इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक 28 विकेट्स गोलंदाज ठरला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने चार कसोटींत 52.57 च्या सरासरीने 368 धावा केल्या होत्या. ओव्हल कसोटीत त्याने 127 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि परदेशातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. आफ्रिकेच्या व्हॅन निएकर्कने दमदार कामगिरी केली. तिने 43 च्या सरासरीने 259 धावा व 8 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेट गाजवले. त्याने 27 ट्वेंटी-20त 72.88च्या सरासरीने 1329 धावा केल्या. त्यात एक शतक व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-20मध्ये 1000 धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.


हेही वाचा – IPL 2022: अर्जुनचा करेक्ट यॉर्कर; इशान किशानला केलं त्रिफळाचीत