घरक्रीडाAsia Cup: जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात पण भारताने.., पाकच्या माजी...

Asia Cup: जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात पण भारताने.., पाकच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी टीम इंडियाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाने सुरक्षेची चिंता करु नये. त्यांनी पाकिस्तानात येऊन आशिया कप खेळावा. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळू शकत नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट बोर्डाने दिले.

टीम इंडियाने सुरक्षाची चिंता करू नये आणि त्यांनी पाकिस्तानात येऊन आशिया कप खेळावा. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळू शकत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. परंतु यानंतर यूएई किंवा इंग्लंडमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताचे सामने होण्याची चर्चा आहे. त्याचवेळी, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळला नाही, तर पाकिस्तानचा संघही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असं पाकिस्तानने म्हटले आहे.

- Advertisement -

मियांदादने नादिर अलीच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, भारताच्या दौऱ्यावर पाकिस्तानला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास वाटतो आणि आता या स्पर्धेसाठी पाकिस्तानात येण्याची भारताचा टर्न आहे. सुरक्षेला विसरा. आमचा विश्वास आहे की, जर मृत्यू यायचा असेल तर तो यायलाच हवा. जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे. त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. पण त्यांनीही येथे यायला हवं. मागच्यावेळी आम्ही तिथे गेलो होतो, पण तेव्हापासून ते येथे आलेच नाहीत. आता त्यांचा टर्न आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 2012 पासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खानने बीसीसीआयला त्यांच्या निर्णयाबद्दल ‘अहंकारी’ म्हटले होते आणि ‘हुकूमशहा’सारखे वागवले होते. यासाठी त्यांना दोषी ठरवले होते.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2023 : धोनीची टीम CSK वर बंदीची मागणी; स्थानिक खेळाडूंना संधी न दिल्याचा होतोय आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -