महिला आयपीएलने मोडला 2008 चा रेकॉर्ड, आजचा दिवस ऐतिहासिक; जय शाहांची माहिती

jay shah
jay shah

बीसीसीआयकडून महिला आयपीएलच्या नवीन पाच फ्रँचायझींची घोषणा करण्यात आली आहे. महिला आयपीएलच्या पाच संघांमध्ये अहमदाबादसाठी सर्वाधिक यशस्वी बोली लावण्यात आली आहे. यावेळी महिला आयपीएलने 2008 चा रेकॉर्ड मोडला असून आजचा दिवस क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

जय शाह यांनी ट्विट करत लिहिलंय की, आजचा दिवस क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठीच्या संघांचा विक्रमी लिलाव झाला आहे. 2008 मध्ये पुरूषांच्या झालेल्या आयपीएल हंगामावेळी संघांवर जेवढी बोली लागली होती त्यापेक्षाही जास्त बोली महिला आयपीएल संघांवर लागली आहे.

ही महिला क्रिकेटमधील एक क्रांती असून केवळ महिला क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणार नाहीये, तर संपूर्ण खेळ जगतात मोठे बदल होणार आहेत, असंही जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबादला 1289 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईला 912.99 कोटींना विकत घेतले आहे. महिला आयपीएलचा तिसरा संघ बंगळुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरूने 901 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्लीला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने 810 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच कॅप्री ग्लोबल होल्डिंग्सने लखनौचा महिला संघ विकत घेतला आहे. त्यांनी 757 कोटी रुपये खर्च केले आहेत. बीसीसीआयला सर्व ५ आयपीएल संघांसाठी 4669.99 कोटी रुपये मिळाले आहेत.


हेही वाचा : WPL 2023: महिला आयपीएलसाठी संघाची घोषणा, अदानीचा अहमदाबाद संघावर