धोनी आणि आशिष शेलारांच्या संभाषणादरम्यान जीवाची एन्ट्री; video होतोय व्हायरल

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि नेते आशिष शेलार यांनी भारताची माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली. यादरम्यान धोनीची मुलगी जीवा त्याठिकाणी आली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Jeeva’s entry during Dhoni and Ashish Shelar’s conversation The video is going vira)

चेन्नईने सामना जिंकल्यानंतर आशिष शेलार धोनीची भेट घेण्यााठी मैदानावर गेले आणि याच दरम्यान त्याची मुलगी झिवाने धावत येऊन धोनीला मिठी मारली. यावेळी तिने आशिष शेलार यांच्याशी देखील हात मिळवणी केली. आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. शेलारांनी हे फोटो शेअर करताना म्हटले की, महान क्रिकेटपटू, चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार एमएस धोनी भेट घेणे आणि संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी त्याची मुलगी जीवा आनंदी होती.

पहिला क्वालिफायर सामना पाहण्यासाठी धोनी पत्नी साक्षी आणि त्याची मुलगी जीवा सामना पाहण्यासाठी आले होते. चेन्नईने सामना जिंकल्यानंतर दोघीही आनंदी होत्या. सामना संपल्यानंतर धोनी आणि आशिष शेलार दोघे चर्चा करत असताना धोनीच्या मुलीने धावत येत त्याला मिठी मारली. बाप लेकीच्या प्रेम पाहून चाहतेही भारावून गेले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

चेन्नई सुपर किंग्ज दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चेन्नईने पहिल्यादा फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 7 विकेट गमावत 172 धावा केल्या. यावेळी ऋतुराज गायकवाडने 44 चेंडून 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 60 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात संघाला निर्धारीत 20 षटकात सर्व बाद 157 धावापर्यंत मजल मारता आली. शुभमन गिलने गुजरातकडून 38 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 42 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही, त्यामुळे गुजरातला 15 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई पहिला क्वालिफायर सामना जिंकताना दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.