नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियात महिला बिग बॅश स्पर्धा खेळवण्यात येत आहे. ब्रिस्बेन हिट्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईकर पोरीने म्हणजेच जेमिमाह रॉड्रिग्ज शानदार खेळी केली. तिने ब्रिस्बेन हिट्सकडून खेळताना सर्वाधिक धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. त्यामुळे तिच्या खेळीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. (Jemimah Rodriguez scored 45 off 31 balls while playing for Brisbane Heats in the big bash league women)
सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात ब्रिस्बेन हिट्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या मेलबर्न स्टार्स संघाने निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावत 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात 139 धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीट्स संघाची सुरुवात खराब झाली. ग्रेस हॅरिसच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर सलामीवरी ग्रेस हॅरिस सुद्धा 19 धावा करून बाद झाली. त्यामुळे ब्रिस्बेन हीट्स संघाच्या 51 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या भारतीय खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जने संघासाठी शानदार खेळी केली.
Jemimah Rodrigues hits Marizanne Kapp out of the Park #WBBL10 pic.twitter.com/KTTNxtRYnB
— Rohit Baliyan (@rohit_balyan) November 17, 2024
या सामन्यात जेमिमाह रॉड्रिग्जने 50 मिनिटे मैदानावर घालवली. या काळात तिने 31 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तिला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही, परंतु तिच्या खेळीमुळे संघाने 100 धावांचा टप्पा पार केला. जेमिमाच्या शानदार खेळीमुळे ब्रिस्बेन हीट्सने मेलबर्न स्टार्सचा 15 चेंडूत आणि 6 विकेट राखून पराभव केला. जेमिमाहच्या शानदार खेळीआधी ब्रिस्बेन हीट्सकडून 18 वर्षीय गोलंदाज लुसी हॅमिल्टनने 4 षटकात केवळ 8 धावा देत 5 विकेट घेतल्या.
— Brisbane Heat (@HeatBBL) November 17, 2024
हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतातही येणार चॅम्पिअन्स ट्रॉफी; ICC ने केली मोठी घोषणा