घरक्रीडाIND vs ENG : विराटने खिलाडूवृत्ती दाखवली; रूटने केले भारतीय कर्णधाराचे कौतुक 

IND vs ENG : विराटने खिलाडूवृत्ती दाखवली; रूटने केले भारतीय कर्णधाराचे कौतुक 

Subscribe

चेन्नईमधील उष्ण वातावरणामुळे रूटच्या उजव्या पायात क्रॅम्प आला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतकी खेळी केली. पहिल्या दिवसअखेर तो १२८ धावांवर नाबाद होता. या खेळीदरम्यान चेन्नईमधील उष्ण वातावरणामुळे रूटच्या उजव्या पायात क्रॅम्प आला. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर पायात क्रॅम्प आल्याने रूट खेळपट्टीवर कोसळला. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली लगेच त्याच्याजवळ गेला आणि त्याचा पाय स्ट्रेच केला. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर विराटची स्तुती केली. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर रूटनेही विराटाचे कौतुक केले.

‘माझ्या पायात थोडा क्रॅम्प आला. मात्र, विराटने लगेच माझ्याजवळ येऊन माझी मदत केली. त्याने खूपच चांगली खिलाडूवृत्ती दाखवली. आपण त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो,’ असे रूट पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराटच्या खिलाडूवृत्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

- Advertisement -

या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ अशी धावसंख्या होती. कर्णधार रूटने १९७ चेंडूत नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याला डॉम सिबलीने ८७ धावा करत उत्तम साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या.


हेही वाचा – जो रूटचे शंभराव्या कसोटीत शतक, दिग्गजांच्या यादीत समाविष्ट

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -