घरक्रीडाजो रुटने दिला इंग्लंडच्या कसोटी संघाचा राजीनामा

जो रुटने दिला इंग्लंडच्या कसोटी संघाचा राजीनामा

Subscribe

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० असा पराभव पत्करावा लागला त्यामुळं जो रूटने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. ३१ वर्षीय जो रूटला २०१७मध्ये कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं होतं. त्याच्याआधी एलिस्टर कुक इंग्लांडच्या कसोटी संघाचा कर्णधार होता.

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० असा पराभव पत्करावा लागला त्यामुळं जो रूटने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. ३१ वर्षीय जो रूटला २०१७मध्ये कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं होतं. त्याच्याआधी एलिस्टर कुक इंग्लांडच्या कसोटी संघाचा कर्णधार होता. दरम्यान इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील ग्रेनाडा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं १० गडी राखत इंग्लांडचा पराभव केला. तसंच, या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला सलग 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं अखेर जो रूटने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

“मला माझ्या देशाचे कर्णधारपद मिळाल्याचा अभिमान वाटतो आणि गेल्या पाच वर्षांकडे मी अभिमानाने मागे वळून पाहीन. इंग्लंड क्रिकेटचा संरक्षक म्हणून काम करणे ही सन्मानाची बाब आहे”, असं रुटने म्हटलं. तसंच, “वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतल्यानंतर मला विचार करायला वेळ मिळाला. त्यानंतर मी इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनाचा देण्याच निर्णय घेतला आहे. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक निर्णय आहे, परंतु मी माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या जवळच्या लोकांशी याबद्दल चर्चा केली आहे. मला माहित आहे की हीच ती योग्य वेळ आहे.” असंही जो रुटने म्हटलं

- Advertisement -

जो रूटने शुक्रवारी इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. २०१७ मध्ये ॲलिस्टर कुकने राजीनामा घेतल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी जो रूटकडे सोपवण्यात आली होती. त्याने इंग्लंडला अनेक मालिका जिंकून दिल्या. २०१८ मघ्ये भारताविरूद्ध ४-१ ने मायदेशातील मालिका आणि २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३-१ ने मोठा विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे २००१ मध्ये तो २००१ नंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला इंग्लंडचा पुरूष कर्णधार बनला. रूटने २०२१ मध्ये श्रीलंकेचा २-० असा पराभव करून या विक्रमाची पुनरावृत्ती केली.

फंलदाज म्हणून रूट हा माजी खेळाडू कुकनंतर इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. कर्णधार म्हणून रूटने इंग्लंडसाठी १४ कसोटी शतके झळकावली आहेत. कर्णधार म्हणून रुटच्या ५,२९५ धावा या इंग्लंडच्या कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ग्रॅमी स्मिथ, ॲलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांच्यानंतर रूट पाचव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

इंग्लंडसाठी कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा विक्रम रूटच्या नावावर आहे. रूटने मायकेल वॉन (२६), सर ॲलिस्टर कुक (२४) आणि सर अँड्र्यू स्ट्रॉस (२४) यांना मागे टाकून इंग्लंड कसोटी संघासाठी सर्वाधिक २७ कसोटी सामने जिंकले आहेत.


हेही वाचा – T20 record : शेवटच्या ओव्हरचा षटकारांचा विक्रम मोडीत, पंड्याने जडेजा, रोहितला टाकले मागे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -