घरक्रीडाIND vs ENG : रूटचा 'डबल' धमाका; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५५५ 

IND vs ENG : रूटचा ‘डबल’ धमाका; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५५५ 

Subscribe

रूटने ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१८ धावांची खेळी केली.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवत भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले. आपला १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटने जवळपास ९ तास किल्ला लढवत ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१८ धावांची खेळी केली. अखेर त्याला शाहबाझ नदीमने पायचीत पकडले. मात्र, भारताच्या गोलंदाजांना दुसऱ्या दिवशीही विकेट मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा इंग्लंडने पुरेपूर उपयोग केला. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची पहिल्या डावात ८ बाद ५५५ अशी धावसंख्या होती.

रूटला स्टोक्सची साथ

इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ३ बाद २६३ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा शतकवीर रूटने दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम राखला. त्याला बेन स्टोक्सची उत्तम साथ लाभली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी रचली. अखेर नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा नादात स्टोक्स बाद झाला. त्याने ११८ चेंडूत ८२ धावांची खेळी केली.

- Advertisement -

रूट २१८ धावांवर बाद 

रूटने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३४१ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर २१८ धावांवर तो बाद झाला. पुढे ऑली पोप (३४), जॉस बटलर (३०) आणि डॉम बेस (नाबाद २८) यांनी चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडने साडे पाचशे धावांचा टप्पा पार केला. भारताकडून ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाझ नदीम आणि अश्विन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.


हेही वाचा – विराटने खिलाडूवृत्ती दाखवली; रूटने केले भारतीय कर्णधाराचे कौतुक 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -