घरक्रीडाJohnson vs Warner : स्कँडलमध्ये अडकलेल्या खेळाडूला हीरोसारखा निरोप का? जॉन्सनचा वॉर्नरवर...

Johnson vs Warner : स्कँडलमध्ये अडकलेल्या खेळाडूला हीरोसारखा निरोप का? जॉन्सनचा वॉर्नरवर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेला डेव्हिड वॉर्नर (Devid Warner) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) कसोटी मालिकेत (Test Series) राष्ट्रीय संघासाठी शेवटची पांढरी जर्सी परिधान करताना दिसणार आहे. डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही, पण तरीही पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार गोलंदाज मिचेल जॉन्सनला (Mitchell Johnson) फारसे आवडलेले नाही. वॉर्नरचा खराब फॉर्म आहे आणि त्याचा ‘सँडपेपर गेट’ स्कँडलमध्येही सहभाग होता. असे असतानाही त्याला निरोपाच्या मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आल्यामुळे जॉन्सनने वॉर्नरवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Why give a heros farewell to a scandal ridden player? Mitchell Johnson targets Devid Warner)

जॉन्सनने द वेस्ट ऑस्ट्रेलियनसाठी आपल्या कॉलममध्ये लिहिले की, आपण डेव्हिड वॉर्नरच्या निरोपाच्या मालिकेची तयारी करत असताना, मला कोणी सांगू शकेल का? संघर्ष करणाऱ्या कसोटी सलामीवीराला स्वतःची निवृत्तीची तारीख ठरवण्याची संधी का मिळाली? आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात अडकलेल्या खेळाडूला हीरोचा निरोप का? असा प्रश्न जॉन्सनने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS 5th T20 : विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमावर ऋतुराज गायकवाडची नजर; इतिहास घडवण्याची संधी

सँडपेपर गेट स्कँडलप्रकरणी जॉन्सनने केवळ वॉर्नरलाच फटकारले नाही, तर त्याने स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शिक्षा केली होती. या घटनेनंतर निलंबन संपल्यानंतरही स्मिथ आणि वॉर्नर यांना कर्णधारपदापासून वंचित ठेवण्यात आल्याची आठवण जॉन्ससने करून दिली. त्यामुळे जॉन्सन आता वॉर्नरच्या निरोपाच्या सामन्याचा बाजूने नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

वॉर्नरची खिल्ली उडवली

जॉन्सनने लिहिले की, ‘सँडपेपर गेट’मध्ये वॉर्नर एकटा नव्हता. तो त्यावेळी संघाचा वरिष्ठ सदस्य होता. तो असा खेळाडू होता, जो ‘नेता’ किंवा वरिष्ठ म्हणून आपल्या शक्तीचा वापर करणे पसंत करत होता. परंतु आता तो ज्या मार्गाने बाहेर पडत आहे, तो अहंकार आणि आपल्या देशाविषयीचा अनादर करत आहे. वॉर्नरसाठी चाहते काय आणतील? असा प्रश्न उपस्थित करत सॅंडपेपरचाही तुटवडा असेल, असा टोलाही त्याने लगावला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे फक्त बॅट किंवा बॉलने तुमची कामगिरी होत नाही. तर तुम्ही तुमचा गेम कसा खेळलात, हे तुम्ही गेल्यानंतरही चाहत्यांच्या कायम मनात राहते.

हेही वाचा – INDIA : निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच बोलावली ‘इंडिया’ची बैठक, 6 डिसेंबरला विरोधक एकवटणार

प्रशिक्षक मॅकडोनाल्डवरही जॉन्सनचा निशाणा 

जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनाही लक्ष्य केले. त्याने म्हटले की, वॉर्नरच्या निवडीचा अर्थ असा होत नाही की, प्रशिक्षकाने गुणवत्तेच्या आधारावर संघाची निवड केली. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी अलीकडेच सांगितले होते की, सध्याच्या कामगिरीच्या आधारे ते यंदाच्या उन्हाळ्यातील कसोटी संघाची निवड करतील. याच वक्तव्यावर निशाणा साधताना जॉन्सन म्हणाला की, ‘ही रणनीती किती काळापासून सुरू आहे, हे जाणून घेणे चांगले राहिल, कारण वॉर्नरला गेल्या काही काळापासून ही रणनिती लागू झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -