Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : जॉनी बेअरस्टो टी-२० संघात; 'या' स्टार खेळाडूला मात्र...

IND vs ENG : जॉनी बेअरस्टो टी-२० संघात; ‘या’ स्टार खेळाडूला मात्र संधी नाहीच   

भारत आणि इंग्लंड यांच्यात १२ ते २० मार्च या कालावधीत पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

Related Story

- Advertisement -

भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोची इंग्लंडच्या संघात निवड झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १२ ते २० मार्च या कालावधीत पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने गुरुवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडने बेअरस्टोला विश्रांती दिली आहे. मात्र, अहमदाबाद येथे होणाऱ्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत तो खेळणार असून त्याची टी-२० संघातही निवड झाली आहे. कसोटी संघाचा कर्णधार जो रूटला मात्र टी-२० संघात संधी देणे इंग्लंडने टाळले आहे. रूटने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना मे २०१९ मध्ये खेळला होता.

मॉर्गन करणार नेतृत्व 

जॉस बटलरही टी-२० मालिकेत खेळणार आहे. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतर बटलर मायदेशी परतला असला तरी टी-२० मालिकेसाठी तो पुन्हा भारतात दाखल होईल. या मालिकेत इयॉन मॉर्गन इंग्लंडचे नेतृत्व करेल. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अ‍ॅलेक्स हेल्सला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये हेल्सने सर्वाधिक ५४३ धावा केल्या होत्या.


इंग्लंडचा संघ : ईयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डाविड मलान, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड.

- Advertisement -