Jonty Rhodes Fielding Viral Video मुंबई : आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 चा 11 वा सामना ऑस्ट्रेलिया मास्टर्स आणि दक्षिण आफ्रिका मास्टर्स यांच्यात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव केला. कर्णधार शेन वॉटसनने या स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. शेन वॉटसनने शतकी खेळी केली. 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. मात्र सामना जरी दक्षिण आफ्रिका पराभूत झाली असली तर, संघातील खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सच्या क्षेत्ररक्षणामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सीमारेषेजवळ केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे जॉन्टी ऱ्होड्सनवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. (jonty rhodes fielding at the age of 55 goes video viral on social media)
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स याने आपल्या क्षेत्ररक्षणाने संपूर्ण क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केलं आहे. जगात कुठेही क्रिकेटचा सामना असल्यास गोलंदाजीवेळी प्रत्येक संघाकडून जॉन्टी ऱ्होड्सची आठवण काढली जाते. कारण मैदानात हवेतील झेल टिपण्यासाठी तो प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे जॉन्टी ऱ्होड्स आता 55 वय आहे, पण या वयातही जॉन्टी ऱ्होड्स आपलं क्षेत्ररक्षण तारुण्याप्रमाणेचं करत असल्याचं पाहायाला मिळत आहे. त्यानुसार, जॉन्टी ऱ्होड्सने इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. त्याच्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
55 YEAR OLD JONTY RHODES GIVING HIS ALL IN THE FIELD. 🤯 pic.twitter.com/C3bXM4nzXL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2025
इंटरनॅशनल मास्टर्स लीगने सोशल मीडियावरील X वर जॉन्टी रोड्सचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये शेन वॉटसन एक फ्रंट शॉट खेळतो. त्यानंतर चेंडू सीमारेषेजवळ पोहोचतो तेव्हा जॉन्टी ऱ्होड्स धावत येतो आणि चेंडूला सीमारेषा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी हवेत झेप घेतो. वयाच्या 55 व्या वर्षी जॉन्टीने आपल्या अप्रतिम फिटनेसने सर्वांना चकित केले. तो अजूनही किती तंदुरुस्त आहे हे त्याने दाखवून दिले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जॅक कॅलिसने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 1 गडी गमावून 260 धावा केल्या. वॉटसनने नाबाद 122 आणि फर्ग्युसनने 85 धावा केल्या. तर बेन डंकने नाबाद 34 धावांची झटपट खेळी खेळली. 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका मास्टर्स संघ 17 षटकांत सर्वबाद 123 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने सर्वाधिक 30 धावा केल्या. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका मास्टर्सचा सामना 137 धावांनी गमवावा लागला.
हेही वाचा – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज IPL 2026 मध्ये खेळणार? खेळाडूची RCBकडून खेळण्याची इच्छा