घरक्रीडामंकडींगबाबत काहीतरी करा !

मंकडींगबाबत काहीतरी करा !

Subscribe

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने मंकडींग पद्धतीने बाद केले होते. राजस्थानच्या डावातील १२ व्या षटकात अश्विन चेंडू टाकण्याआधी थांबला आणि नॉन-स्ट्रायकर बटलरने क्रिज सोडल्यावर अश्विनने त्याला चेंडू न टाकता धावचीत केले. खासकरून अश्विन जेव्हा चेंडू टाकणे अपेक्षित होते, त्यावेळी बटलर क्रीजमध्येच असल्याने अश्विनवर जोरदार टीका झाली. अश्विनने स्वतः त्याच्या कृत्याचे समर्थन केले होते. मात्र, त्यावेळी बटलरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता मंकडींगबाबत काहीतरी केले पाहिजे असे तो म्हणाला आहे.

त्यावेळी मी या प्रकाराबाबत खूप निराश झालो होतो. मला ज्यापद्धतीने बाद करण्यात आले ते मला आवडले नव्हते. पण, त्याहूनही काय निराशाजनक होते तर ते म्हणजे मी पुढील सामन्यांमध्ये क्रीज न सोडण्याबाबत जरा जास्तच विचार करत होतो आणि फलंदाजीदरम्यान माझे लक्ष विचलित होत होते. त्यामुळे बंगळुरूविरुद्ध काही धावा (५९) करून संघाच्या विजयात योगदान दिल्याचा आणि नॉन-स्ट्राईकवर असताना क्रीज न सोडण्याबाबत नाही तर फलंदाजीबाबत विचार केल्याचा मला आनंद आहे.

- Advertisement -

त्या (पंजाबविरुद्ध) सामन्यात मला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्यात आले असे मला वाटते, कारण तुम्ही जर व्हिडियो नीट बघितलात तर तुम्हाला कळेल की, जेव्हा चेंडू टाकणे अपेक्षित होते, तेव्हा मी क्रीजच्या आतच होतो. त्यामुळे मंकडींगबाबत काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे. नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाने चेंडू टाकण्याआधी फार पुढे जाता कामा नये हे योग्य असले तरी या कायद्याबाबत अजूनही बर्‍याच शंका आहेत, असे बटलरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -