घरक्रीडा'शेन वॉनला खूप मिस करतोय...', शतकी खेळीनंतर जोस बटलर भावूक

‘शेन वॉनला खूप मिस करतोय…’, शतकी खेळीनंतर जोस बटलर भावूक

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL 2022) प्ले ऑफमधील (Play Off) दुसरा क्वॉलिफायरचा (Qualifier) सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात झाला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL 2022) प्ले ऑफमधील (Play Off) दुसरा क्वॉलिफायरचा (Qualifier) सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने (jos buttler) 112 धावा केल्या. बटलरच्या या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने बंगळुरूवर विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या शतकी खेळीनंतर जोस बटलरने मोठे वक्तव्य केले आहे. ‘राजस्थान रॉयल्सचा (RR) पहिला कर्णधार शेन वॉर्न (Shane Warne) या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण त्याला मिस करत आहोत’, असे वक्तव्य बटलरने केले.

नेमक काय म्हणाला बटलर?

“या स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Final Match) खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. राजस्थान रॉयल्सचा (आरआर) पहिला कर्णधार शेन वॉर्न या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण त्याला मिस करत आहोत. आयपीएल ही टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे”, असेही जोस बटलर म्हणाला.

- Advertisement -

“मी या पर्वात फार कमी अपेक्षा घेऊन आलो. पण ऊर्जेची कमतरता नव्हती. अंतिम सामना खेळणे हा एक चांगला अनुभव होता. या हंगामाच्या मध्यभागी दबाव जाणवत होता. सुमारे 1 आठवड्यापूर्वी माझ्या आसपासच्या लोकांनाही सांगितले होते. त्या लोकांनी मला मदत केली आणि मी चांगल्या मानसिकतेने कोलकात्याला गेलो. कधीकधी परिस्थिती माझ्या अनुकूल नसते. अशा परिस्थितीत मी चुकीचा फटका मारून आऊट होतो. पण कुमार संगकाराने मला सांगितले की, जितका जास्त वेळ तुम्ही विकेटवर घालवाल, तितकी चांगली कामगिरी कराल.”, असेही जोस बटलर म्हणाला.

14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत

दरम्यान, राजस्थान रॉयल्स (RR) संघ तब्बल 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा होणार आहे. हा सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे.

- Advertisement -

बटलरचे चौथे शतक

या सामन्यात जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले. या पर्वातील बटलरचे हे चौथे शतक (jos buttler Forth Century) आहे. यासह तो एका पर्वात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीसोबत (Virat Kohli) संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.


हेही वाचा – आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी 800चे तिकीट 8000 आणि 1500चे तिकीट 15000 रुपयांना घेण्यास प्रेक्षकांची तयारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -