घरक्रीडाUS OPEN 2018 : दुखापतीमुळे नदालने अर्ध्यातच सामना सोडला 

US OPEN 2018 : दुखापतीमुळे नदालने अर्ध्यातच सामना सोडला 

Subscribe

अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीतील जुआन मार्टिन डेल पोट्रोविरुद्ध झालेला सामना राफेल नदालला दुखापतीमुळे अर्ध्यातच सोडावा लागला.  

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामना स्पेनच्या राफेल नदालला अर्ध्यातच सोडावा लागला. त्यामुळे त्याचे चौथ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. तर नदालने माघार घेतल्यामुळे जुआन मार्टिन डेल पोट्रोने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. डेल पोट्रोने २००९ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

गुडघा दुखावल्याने माघार

डेल पोट्रो आणि नदाल यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. दोन्ही खेळाडूंत ६-६ अशी बरोबरी असल्याने हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. ज्यात (७-३) अशी बाजी मारत डेल पोट्रोने हा सेट ७-६ असा जिंकला. हा सेट संपताच नदालचा उजवा गुडघा दुखायला लागला. पण तरीही त्याने सामना खेळत राहायचे ठरवले. दुसऱ्या सेटमध्ये नदालला दुखापतीमुळे आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तर डेल पोट्रोने अप्रतिम खेळ करत हा सेट ६-२ असा जिंकला. हा सेट संपल्यानंतर नदालचा गुडघा आणखीच दुखायला लागला. हे दुखणे असह्य झाल्याने त्याने हा सामना अर्ध्यातच सोडण्याचा निर्णय घेतला.

पोट्रोची फायनलमध्ये एन्ट्री 

नदालने माघार घेतल्यामुळे अर्जेन्टिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. याआधी त्याने २००९ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आता त्याला ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याची संधी आहे. अंतिम फेरीत त्याचा नोवाक जोकोविचशी सामना होईल.
- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -