घरक्रीडाISSF World Championships : स्कीट नेमबाजीत भारतीयांची चमक

ISSF World Championships : स्कीट नेमबाजीत भारतीयांची चमक

Subscribe

आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेच्या स्कीट नेमबाजी प्रकारात भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या गुरनिहाल सिंगने कांस्य पदकाची कमाई केली.

साऊथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपले अप्रतिम प्रदर्शन सुरू ठेवले आहे. या स्पर्धेत भारताच्या संघाने स्कीट नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. तर स्कीटमध्येच भारताच्या गुरनिहाल सिंगने वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.

अंतिम फेरीत चांगले प्रदर्शन 

स्कीट नेमबाजी प्रकारच्या सांघिक स्पर्धेत गुरनिहाल, अनंतजित आणि आयुष रुद्रराजू या तिघांच्या संघाने ३५५ गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक पटकावले. ३५५ गुणांमध्ये गुरनिहालच्या ११९, अनंतजितच्या ११७ आणि आयुष रुद्रराजूच्या ११९ गुणांचा समावेश होता. याआधी स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले होते.

वैयक्तिक स्पर्धेतही पदकाची कमाई 

भारताच्या गुरनिहाल सिंगने वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक मिळवले. त्याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चांगले प्रदर्शन केले. अंतिम फेरीत त्याने ४६ गुणांसह कांस्य पदक मिळवले. तर इटलीच्या नेमबाजाने ५५ गुणांसह सुवर्ण पदक मिळवले.

भारताच्या खात्यात २० पदकं 

आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण २० पदकांची नोंद झाली आहे. ज्यात ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच ही स्पर्धा २०२० ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीनेही महत्वाची आहे. या स्पर्धेतील प्रदर्शनामुळे अपुर्वी चंदेला आणि अंजुम मुद्गिल या नेमबाज २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -