घरक्रीडाकेएल राहुलने मैदानाबाहेर दाखवला स्वॅग!

केएल राहुलने मैदानाबाहेर दाखवला स्वॅग!

Subscribe

सलामीवीर केएल राहुल जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. मैदानावरील स्टाईलने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या के एल राहुलने मैदानाबाहेरही आपली स्टाईल दाखवली. भारतीय क्रिकेटपटू मयांक अगरवाल याचे सोमवारी लग्न झाले. मयांक त्याची प्रेयसी आशिता सूदशी लग्नबंधनात अडकला. या लग्न सोहळ्याला बऱ्याच खेळाडूंनी हजेरी लावली. मात्र या सर्वात केएल राहुलच्या स्टाईलने सर्वांचीच मने जिंकली असून, तो एका ट्रॅडिशनल लूकमध्ये सर्वांसमोर आला. त्याचे ट्रॅडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. केएल राहुल सोबत कर्नाटकचा फास्ट बॉलर रोनीत मोरे देखील या फोटोमध्ये दिसतो.

- Advertisement -

यापूर्वीदेखील क्रिकेटर्सच्या लग्नात त्यांचे मित्र इतर क्रिकेटर्सच्या येण्याने चर्चेला उधाण आले होते. हरभजनच्या लग्नातील युवराज सिंगचा डान्स देखील सोशल मीडियावर बराच हिट झाला होता. के एल राहुल यावर्षी किंग्स ११ पंजाबमध्ये होता. आयपीएल २०१८ मधील त्याचे प्रदर्शन अप्रतिम असून, सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ६५९ धावांसह राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी त्याचा ५४.९१ इतका अॅव्हरेज आणि १५८.४१ चा स्ट्राईक रेट होता. त्याने आयपीएलमध्ये सहा अर्धशतके झळकावली आहेत. राहुलच्या या अप्रतिम कामगिरीनंतर राहुल तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला होता. या उत्कृष्ट कामगिरीनंतर आता त्याच्या या ट्रॅडिशनल ड्रेसिंगमधील फोटोजमुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -