कगिसो रबाडाने हिंदीतून केली सासू-सासऱ्यांची मनधरणी, व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामन्यांचा थरार रंगला आहे. काल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. परंतु दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मैदानात उतरल्यानंतर फलंदाजांची नाचक्की करणाऱ्या कगिसो रबाडाने चक्क हिंदी भाषेतून आपल्या सासू-सासऱ्यांची मनधरणी केली आहे. परंतु हिंदी बोलताना तत-फफ झाल्याचं त्याच्याकडून दिसत आहे. कगिसो रबाडा आपल्या प्रेयसीच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी आरजे करिष्माकडून टीप्स घेताना दिसत आहे. मात्र, यावेळी हिंदी बोलताना रबाडाने खूप चुका केल्या. हे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Karishma (@rjkarishma)

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज रबाडा टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत एकाच गटात आहेत. परंतु विश्वचषकासाठी सराव सामन्यांचा थरार रंगला आहे. काल झालेल्या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडवर मात करत ९ गडी राखून मोठा विजय मिळवला.


हेही वाचा : कोरोनाबाधित खेळाडूंनाही खेळता येणार सामना; आयसीसीचा मोठा निर्णय