घरक्रीडाकेन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद; 'हा' खेळाडू करणार नेतृत्व

केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद; ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

Subscribe

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसनच्या जागी आता अनुभवी गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसनच्या जागी आता अनुभवी गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. परंतु, केन विल्यमसन न्यूझीलंड वनडे आणि टी-20चे कर्णदारपद कायम राहणार आहे. (Kane Williamson steps down as test captain of new Zealand will lead in odi t20i tim Southee next test captain)

न्यूझीलंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर केन विल्यमसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. केनने सांगितले की, “कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी अव्वल दर्जाचे आहे. त्याचा कर्णधार म्हणून मी आव्हानांचा आनंद घेतला. कर्णधार असताना तुमचे काम आणि ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला वाटले की, कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे”.

- Advertisement -

केन विल्यमसनने 38 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याने 22 वेळा संघाला विजय मिळवून दिला असून, 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. दरम्यान, केन विल्यमसननंतर आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार टीम साऊदी पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याशिवाय, टॉम लॅथम संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंड संघाचा 31वा कसोटी कर्णधार बनला आहे. याआधी तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संघाची कमान सांभाळताना दिसला होता.

- Advertisement -

उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज असलेला 34 वर्षीय सौदीने आतापर्यंत 88 कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या लांबलचक फॉरमॅटमध्ये त्याच्या एकूण 347 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने कसोटीत 5 अर्धशतकांसह 1855 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 204 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 134 बळी घेतले आहेत.


हेही वाचा – मोठी बातमी! आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -