घरक्रीडाभारतीय कुस्तीपटू रवी दहियाला प्रतिस्पर्ध्याचा कडकडीत चावा, फोटो पाहून अंगावर येईल शहारा

भारतीय कुस्तीपटू रवी दहियाला प्रतिस्पर्ध्याचा कडकडीत चावा, फोटो पाहून अंगावर येईल शहारा

Subscribe

घटना घडत असताना कोणाची नजरही यावर पडली नाही आणि भारतीय कुस्तीपटू ते सहन करत सामना खेळतच राहिला

भारताला कुस्तीमध्ये निराशा येणार की काय असा प्रश्न पडला असताना भारताचा कुस्तीपटू रवी दहिया यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. मात्र उपांत्य फेरीतील सामन्यादरम्यान रवीकुमार दहियाला प्रतिस्पर्ध्याने कडकडून चावा घेतला आहे. या चावा घेतलेला व्रण पाहून एखाद्याच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. उपांत्य फेरीत रवी दहियाने ५७ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवनेचा परभव केला आहे. मात्र नरीस्लामने सामन्यादरम्यान भारतीय कुस्तीपटू रवी दहियाला कडकडीत चावा घेतला आहे. विशेष म्हणजे सामन्यादरम्यान ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू रवी दहिया अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ५७ किलो वजनी गटात रवी दहिया आणि कझाकिस्तानचा कुस्तीपटू नूरीस्लाम यांच्यात सामना होता. या सामन्यादरम्यान नूरीस्लामने दहियाला तगडे आव्हान दिलं होतं. रवी दहियाने नूरिस्लामला जमिनीवर लोळवल्यावर जखडून पकडले होते. यावेळी दहियानं पकड मजबूत केली होती यामुळे दंडाचा भाग नूरिस्लामच्या मुखाजवळ होता. याचा फायदा घेत नूरीस्लामने दहियाला कडकडीत चावा घेतला आहे. ही घटना घडत असताना कोणाची नजरही यावर पडली नाही आणि भारतीय कुस्तीपटू ते सहन करत सामना खेळतच राहिला आपले लक्ष विचलित होऊन दिले नाही.

- Advertisement -

भारतीय कुस्तीपटु रवी दहियाला नूरिस्लामने मोठं आव्हान दिलं होते मात्र दहियाने त्याचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता मात्र दहियाला ऑलिम्पिक स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

हॉकी संघाने रचला इतिहास

भारतीय पुरुष हॉकी संघानं ४ दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत ५:४ असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे. भारताने १९८० साली पहिल्यांदा हॉकीमध्ये पदक मिळवले होते यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक मिळवले आहे. भारताने शानदार खेळी करत ५:४ ने जर्मनीचा पराभव केला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय टीमने संघात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आपल्या उत्तम खेळीने भारताला पदक मिळवून दिलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -