घरक्रीडाशिखरला बाद केल्यावर गोलंदाजाने मारली त्याचीच स्टाईल

शिखरला बाद केल्यावर गोलंदाजाने मारली त्याचीच स्टाईल

Subscribe

किमो पॉल या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने शिखर धवनला बाद केल्यावर शिखरच्याच स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज वनडे मालिकेतील चौथा सामना मुंबईमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात केली होती. पण तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शिखर धवनला या सामन्यातही चांगल्या सुरूवातीला मोठ्या धावसंख्येत बदलता आले नाही. त्याला ३८ धावांवर किमो पॉल या युवा गोलंदाजाने बाद केले. शिखरला बाद केल्यानंतर पॉलने शिखरच्याच स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केले. ‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा शिखर कॅच पडल्यानंतर ‘थाय-फाय’ या आपल्या सेलीब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. पण यावेळी पहिल्यांदाच दुसऱ्या खेळाडूने शिखरला बाद करून ‘थाय-फाय’ केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -