घरक्रीडाWI vs SA : केशव महाराजची विक्रमी हॅटट्रिक; दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

WI vs SA : केशव महाराजची विक्रमी हॅटट्रिक; दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

Subscribe

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेणारा महाराज केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे.

डावखुरा फिरकीपटू केशव महाराजच्या विक्रमी हॅटट्रिकच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा १५८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची ही कसोटी मालिका २-० अशी जिंकली. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव १६५ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने ३६ धावांत विंडीजचा निम्मा संघ गारद केला, ज्यात हॅटट्रिकचाही समावेश होता. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी वेगवान गोलंदाज जेफ ग्रिफिन यांनी १९६० मध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर तब्बल ६१ वर्षांनी महाराजने ही अनोखी कामगिरी केली.

- Advertisement -

हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकीपटू

सेंट लुसिया येथे झालेला दुसरा कसोटी जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात विंडीजपुढे ३२४ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग विंडीजची ३ बाद १०७ अशी धावसंख्या होती. मात्र, विंडीजच्या डावातील ३७ व्या षटकात केशव महाराजने किरेन पॉवेल, जेसन होल्डर आणि जॉश डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅटट्रिक घेतली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

- Advertisement -

कागिसो रबाडा सामनावीर

३२४ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा चौथा डाव १६५ धावांत आटोपला. विंडीजकडून पॉवेल (५१) आणि कायेल मेयर्स (३४) या दोघांनाच तीस धावांचा टप्पा पार करता आला. दक्षिण आफ्रिकेच्या महाराजने पाच, कागिसो रबाडाने तीन विकेट घेतल्या. रबाडाने दोन डावांत मिळून चार विकेट, तसेच फलंदाजीत दोन डावांत मिळून ६१ धावा केल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -