घरक्रीडाKevin Pietersen : “मी IPL लिलावात उतरलो तर कसं राहिल?” इंग्लंडच्या माजी...

Kevin Pietersen : “मी IPL लिलावात उतरलो तर कसं राहिल?” इंग्लंडच्या माजी खेळाडूची इच्छा व्यक्त…

Subscribe

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रिमियर ली अर्थात आयपीएल (IPL) मध्ये खेळण्याची संधी मिळावी अशी, इच्छा जगभरातील क्रिकेटपटूंची असते. मात्र प्रत्येकालाच आयपीएलमध्ये संधी मिळतेच असे नाही. असे असले तरी इंग्लंडच्या 43 वर्षीय खेळाडूंने पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसन याने ही इच्छा व्यक्त केली आहे. (Kevin Pietersen How will I survive if I enter the IPL auction The former England player expressed his wish)

केविन पीटरसन हा सध्या भारतात लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 मध्ये व्यस्त आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले जगभरातील अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू या लीन स्पर्धेत पुन्हा एकदा खेळताना दिसत आहेत. त्यामुळे चाहतेही आपल्या आवडत्या खेळाडूंला मैदानावर पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहून ते अनेक युवा खेळाडूंवर मात करताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – तेलंगणा: BJP चा पहिल्याच दिवशी बहिष्कार; प्रोटेम स्पीकर पदी अकबरुद्दीन ओवैसींच्या नियुक्तीला विरोध

इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसन हा लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 मध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. अलीकडेच 7 डिसेंबर रोजी इंडिया कॅपिटल्स आणि मणिपाल टायगर्स यांच्यातील क्वालिफायर सामन्यात केविन पीटरसनच्या बॅटमधून चौकार षटकारांचा पाऊस पडताना दिसला. पीटरसनने स्फोटक खेळी करताना चौकार आणि 5 शानदार षटकारांचा मदतीने 56 धावांची शानदार खेळी केली. पीटरसरनच्या फलंदाजीमुळे मणिपाल टायगर्सने क्वालिफायर सामना 6 विकेट्स राखून जिंकला. यानंतर त्याने एक ट्वीट करत आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

केविन पीटरसनने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटले?

केविन पीटरसन म्हणाला की, मी आयपीएल 2024 च्या लिलावात प्रवेश केला तर कसे राहिल? पीटरसनची ही पोस्ट खूप वेगाने व्हायरल होत असून चाहते त्यावर मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पीटरसनच्या या पोस्टवर टिप्पणी करताना एका चाहत्याने म्हटले की, ‘तुला नवीन शूजची जोडी लागेल मित्रा! कारण तुम्ही गोल्फ शूजमध्ये आयपीएल खेळू शकत नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘तुम्ही ज्या गोलंदाजांचा सामना करत आहात ते कदाचित आयपीएलमधील प्रशिक्षक असतील. गोलंदाजीच्या गुणवत्तेत इतका मोठा फरक आहे.

हेही वाचा – Mla Disqualification : राहुल शेवाळेंची उलट तपासणी; विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावले

केविन पीटरसनची क्रिकेट कारकीर्द

दरम्यान, केविन पीटरसनने इंग्लंडसाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने 100 हून अधिक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 8000 आणि 4000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 36 सामने खेळताना 1001 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 103 धावा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -