घरक्रीडाAshesh series : यंदा अॅशेश मालिकेला मुकणार, केविन पीटरसनने ट्विट केले कारण

Ashesh series : यंदा अॅशेश मालिकेला मुकणार, केविन पीटरसनने ट्विट केले कारण

Subscribe

ऑस्ट्रेलियात आगामी कालावधीत होणारी अॅशेश मालिका आता Covid-19 प्रोटोकॉलमुळे चर्चेत आली आहे. अनेक इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाच्या कडक नियमावलीमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पाच कसोटी मालिकांची सिरीज ८ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान ही अॅशेश मालिक आयोजित करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. सोमवारी एक ट्विटच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या सद्य परिस्थितीवरही केवीन पिटरसनने भाष्य केले आहे.

- Advertisement -

सततच्या बायोबबल्सवर केविन पीटरसनने टीका केली आहे. या बायोबबल्समुळे खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी येत्या अॅशेश मालिकेसाठी काही केल्या जाण्याची शक्यता कमी असल्याचे पीटरसनने स्पष्ट केले आहे. यंदा अॅशेशसाठी जाण्याचा झिरो चान्स असल्याचे पीटरसनने स्पष्ट केले आहे. अतिशय कठोर असे क्वारंटाईनची नियमावली रद्द झाली नाही तर मी माझ्या कुटूंबासोबत यंदाची अॅशेश मालिका मुकणार असल्याचेही केवीन पीटरसनने म्हटले आहे. खेळाडूंनीही आता बायो बबल्सची औपचारिकता पुरेशा प्रमाणात पुर्ण केल्याचे पीटरसनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

नुकत्याच वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या एका बैठकीत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या कुटूंबाच्या दौऱ्याच्या विषयावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली होती. आगामी दोन महिन्यांच्या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात क्वारंटाईनच्या कालावधीच्या मुद्द्यावर वाटाघाटी सुरू आहेत. त्यातच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने फीट झाल्यास ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाकडे अॅशेश युआरएन आहे. याआधीची अॅशेश मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात २-२ अशा पद्धतीने ड्रॉ झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – T20 World Cup 2021: धोनी संघासोबत असणे हा सर्वोत्तम निर्णय- मायकल वॉन


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -