Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

Khel Ratna Award 2021 ram nath kovind gave Major Dhyanchand Khel Ratna Award to 12 players including Neeraj Chopra
Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासह एकूण १२ खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपतींच्या एका कार्यक्रमात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि पदक पटकवणाऱ्या एकूण १२ खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून यंदा मेजर ध्यानंचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलं आहे.

नीरज चोप्राने ऑगस्ट महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करुन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकवणाऱ्या अभिनव बिंद्रानंतर नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्रासह खेलरत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार, बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवणारी लोव्हलिना बोरगोहेन, हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि गोलकीपर पीआर श्रीजेश, नेमबाज अवनि लेखरा, सुमित अंतिल, बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि पॅरा शुटिंगमध्ये मनीष नरवाल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय महिला टेस्ट टीमची कर्णधार मिताली राजलाही खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ती हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्रीलाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून तो सुद्धा देशातील पहिलाच फुटबॉल पटू ठरला आहे.


हेही वाचा : NZ vs Aus कोण लिफ्ट करणार यंदाचा टी २० विश्वचषक? उद्या चुरशीची लढत