घरक्रीडामहाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

Subscribe

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी आपला दमदार खेळ सुरु ठेवत ज्युनियर खो-खो राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सुरत येथील वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा १५-७ असा एक डाव आणि आठ गुणांनी पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या रामजी कश्यपने ४:०० मिनिटे संरक्षण करत दोन खेळाडू बाद केले.

त्याला विजय शिंदेने १:३०, २:५० मि. संरक्षण आणि दोन खेळाडू बाद, सौरभ आहिरने २:१० मि. संरक्षण आणि दोन खेळाडू बाद, दिलीप खांडवीने १:२० मि. संरक्षण आणि तीन खेळाडू बाद करत चांगली साथ दिली. दिल्लीच्या मदनने १:०० मिनिट संरक्षण करताना महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना बाद करत चांगली झुंज दिली.

- Advertisement -

मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूवर १०-६ असा एक डाव आणि चार गुणांनी विजय मिळवला. जानवी पेठे १:३०, ३:२० मि. संरक्षण; ऋतुजा भोर २:००, ३:०० मि. संरक्षण, रेश्मा राठोड २:५० मि. संरक्षण आणि तीन बळी यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -