घरक्रीडाअंपायरवर व्यक्त केलेली नाराजी भोवली; पोलार्डला बसला दंड

अंपायरवर व्यक्त केलेली नाराजी भोवली; पोलार्डला बसला दंड

Subscribe

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे जेतेपद मिळवत एक विक्रम कायम केला आहे. मुंबईच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला तो कायरन पोलार्डने. मुंबईच्या एकूण १४९ रन्समध्ये पोलार्डने ४१ रन्सचा हातभार लावला होता. मात्र शेवटच्या ओव्हरला अंपायर सोबत झालेला वाद आता पोलार्ड भोवला आहे. ड्वेन ब्राव्हो चेन्नईतर्फे शेवटची ओव्हर टाकत असताना एक व्हाईट बॉल अंपायरने दिला नाही, त्यावर पोलार्डने आपल्या शैलील नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या याच शैलीवर आक्षेप घेत त्याच्या मानधनातून २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पहिल्या पाच ओव्हरमध्ये तडाखेबाज बॅटिंग केल्यानंतर डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा एकापाठोपाठ आऊट झाले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव गडगडला सातत्याने एका पाठोपाठ विकेट्स पडतच राहिल्या. फक्त पोलार्डने एका बाजुने डाव सावरला होता. इंनिगची शेवटची ओव्हर करण्यासाठी बॉल ड्वेन ब्राव्होच्या हाती सोपविण्यात आला होता. ब्राव्हो आणि पोलार्ड कॅरेबियन खेळाडू असल्यामुळे ही ओव्हर हाय व्होल्टेज होणार यात वाद नव्हता. मात्र भलताच वाद पेटला.

- Advertisement -

पोलार्ड प्रत्येक बॉल हिट करणार याचा अंदाज ब्राव्होला होता. त्यामुळे ब्राव्होने त्याला ऑफ स्टम्पच्या वाईड बाजूला खेळवण्यास सुरुवात केली. पहिला बॉल मिस झाल्यानंतर दुसराही बॉल तसाच गेला. मात्र जास्तच वाईड होता. तरिही अंपायर नितीन मेनन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाराज झालेल्या पोलार्ड पुढच्या बॉलवर ऑफ स्टम्पच्या बाजुला असलेल्या वाईडच्या रेषेबाहेर जाऊन उभा राहिला. जसा ब्राव्हो धावत येत होता, तसा पोलार्ड अजूनच वाईड बाजुला गेला. यावर अंपायरने पोलार्ड ताकिद दिली होती.

अंतिम सामना संपताच आयपीएलच्यावतीने प्रेस रिलीज काढून दंड लादल्याची माहिती दिली. पोलार्डने देखील आपला गुन्हा मान्य केला. आयपीएलच्या २.८ नियमानुसार खेळाडू आणि संघाने देखील आपली चूक मान्य केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -