WI vs SL : पोलार्ड ‘द सिक्सर किंग’! युवराज सिंगच्या विक्रमाशी केली बरोबरी

पोलार्डने श्रीलंकेचा ऑफस्पिनर अकिला धनंजयाच्या षटकात सहा षटकार मारले. 

pollard hits six sixes in an over
किरॉन पोलार्ड

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याने बुधवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात आपल्या शैलीत फलंदाजी करत एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा पोलार्ड हा केवळ तिसरा फलंदाज ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सने २००७ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये, तर भारताच्या युवराज सिंगने २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये ही कामगिरी केली होती. पोलार्डने श्रीलंकेचा ऑफस्पिनर अकिला धनंजयाच्या षटकात सहा षटकार मारले.

पोलार्डच्या ११ चेंडूत ३८ धावा

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ बाद १३१ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची ४ बाद ६२ अशी अवस्था झाली होती. वेस्ट इंडिजच्या डावातील सहावे षटक धनंजयाने टाकले. या षटकात पोलार्डने सहा चेंडूंवर सहा षटकार लगावले. पोलार्डने एकूण ११ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने १३२ धावांचे लक्ष्य १३.१ षटकांत गाठले. धनंजयाने या सामन्यात हॅटट्रिकही घेतली.

केवळ तिसरा फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा पोलार्ड हा केवळ तिसरा फलंदाज ठरला. याआधी हर्शेल गिब्सने २००७ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये, तर युवराज सिंगने २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये एका षटकात सहा षटकार मारले होते. युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात ही विक्रमी कामगिरी केली होती.