घरक्रीडाICC ने ट्विट केला 'किंग कोहली' फोटो; लोकांनी व्यक्त केली नाराजी

ICC ने ट्विट केला ‘किंग कोहली’ फोटो; लोकांनी व्यक्त केली नाराजी

Subscribe

आयसीसीने अपलोड केलेल्या फोटोवर नेटीझन्स संतापले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच (ICC) ने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक अनोखा फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे. साऊथहॅम्प्टनम येथे आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगत आहे. त्या दरम्यान ICC ने राजेशाही पेहरावातला किंग कोहलीचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये हातात बॅट आणि बॉल घेतलेल्या कोहलीने आपल्या खांद्यावर भारताचा तिरंगा घेतलेला दिसत आहे. तर त्याच्या डोक्यावर हिरेजडीत मुकूट शोभून दिसत आहे.

- Advertisement -

मात्र नेटीझन्सनी या फोटोवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय चाहत्यांनी हा फोटो कोहलीचा नसून के.एल. राहूलचा असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी ICC ला रिप्लाय देत तुम्ही कोहलीचा फोटो वापरलात की राहुलचा? असा सवाल विचारला आहे.

- Advertisement -

तर भारताबाहेरील लोकांनी ICC ही BCCI च्या मालिकीची बनली असल्याची टीका केली आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारताने १९८३ आणि २०११ असे दोनदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. यावेळी पहिल्यांदाच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक खेळत आहे. गतवेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकाची ट्रॉफी उचलली होती. यावेळी धोनी संघात असल्यामुळे कोहलीला त्याचा फायदाच होणार आहे. त्याशिवाय कोहलीने जागतिक क्रमवारीत बॅट्समन म्हणून आपले नाव कमावलेले आहे. मात्र हा विश्वचषक त्याचे बॅटिंग आणि नेतृत्वाच्या कौशल्याची परिक्षा घेणारा आहे. त्यामुळे त्याची कामगिरी किंग सारखी राहिल का? हे पाहावे लागेल.

क्रिकेट विश्वात कोहली हा ‘रन मशीन’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. मागच्या काही वर्षात त्याने सातत्याने भारतासाठी रन्स केले आहेत. मागच्यावर्षी त्याला ICC क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कोहली क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चांगला खेळ करत आहे. विश्वचषक सुरु होण्याआधी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिका, विंडीज, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड विरोधात एक दिवसीय सामन्यांची मालिका जिंकलेली आहे. भारतीय संघाची ही विजयी मालिका विश्वचषकातही कायम राहो, हीच सर्व भारतीयांची इच्छा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -