घरक्रीडाकेकेआरची मोठी घोषणा, श्रेयस अय्यरऐवजी 'या' खेळाडूची संघाच्या कर्णधारपदी निवड

केकेआरची मोठी घोषणा, श्रेयस अय्यरऐवजी ‘या’ खेळाडूची संघाच्या कर्णधारपदी निवड

Subscribe

आयपीएलच्या १६व्या हंगामाला ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. यावेळी विविध प्रकारच्या घडामोडी समोर येत आहेत. अशीच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे केकआरने म्हणजे कोलकाता नाइट रायडर्सने १६व्या हंगामासाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज नितीश राणा आता केकेआरची धुरा सांभाळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

श्रेयर अय्यर दुखापत झाल्यामुळे यंदाच्या हंगामात तो सहभागी होऊ शकणार नाही. नितीश राणा २०१८ पासून केकेआरशी जोडला गेला आहे. याआधी केकेआरचा नवा कर्णधार म्हणून शार्दुल ठाकूर, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांचीही नावे समोर येत होती. मात्र, फ्रँचायझीने भारतीय फलंदाजावर विश्वास व्यक्त करत नितीश राणाकडे कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे.

- Advertisement -

श्रेयस अय्यर नेमकं काय झालं?

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यर दुखापतीचा बळी ठरला होता. त्यानंतर श्रेयसवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते किंवा तो बराच काळ मैदानाबाहेर राहणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अय्यरच्या दुखापतीमुळे केकेआरसमोर कर्णधारपदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता अय्यरच्या जागी राणा कर्णधारपद सांभाळणार आहे.

नितीश राणाने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याच्या दुसऱ्या सत्रातच राणाने ३०० हून अधिक धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, २०१८ च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने नितीश राणाला करारबद्ध केले होते. तेव्हापासून राणा फ्रँचायझीसाठी पाच हंगाम खेळला आहे.

राणाच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ९१ सामन्यात २८च्या सरासरीने २ हजार १८१ धावा केल्या आहेत. राणाने आयपीएलमध्ये १५ अर्धशतकंही झळकावली आहेत.


हेही वाचा : आम्ही त्याला जोकर म्हणायचो.., ड्रेसिंगरूममधील ख्रिस गेलचा कोहलीने सांगितला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -