KKR vs DC Live Update : कोलकाता विजयी 

आज आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध दिल्ली असा सामना होत आहे.

nitish rana
नितीश राणा

दिल्लीच्या २० षटकांत ९ बाद १३५ धावा. कोलकाता ५९ धावांनी विजयी.


चक्रवर्तीने घेतल्या पाच विकेट. पंत (२७), हेटमायर (१०), अय्यर (४७), स्टोइनिस (६) आणि अक्षर पटेल (९) यांना बाद केले.


वरुण चक्रवर्तीची उत्कृष्ट गोलंदाजी.


श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. १० षटकांनंतर दिल्ली २ बाद ६४.


शिखर धवन केवळ ६ धावा करून बाद.


दिल्लीला पहिल्याच चेंडूवर झटका. पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला खातेही न उघडता पाठवले माघारी.


कोलकाताच्या २० षटकांत ६ बाद १९४ धावा.


राणाची उत्कृष्ट फलंदाजी. ५३ चेंडूत ८१ धावांची खेळी.


नरीन ३२ चेंडूत ६४ धावा करून बाद. राणासोबत ११५ धावांची भागीदारी.


राणाचे ३५, तर नरीनचे २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण.


नितीश राणा आणि सुनील नरीनने कोलकाताचा डाव सावरला.


दिनेश कार्तिक केवळ ३ धावा करून माघारी. रबाडाने केले बाद.


नॉर्खियाने शुभमन गिल (९) आणि राहुल त्रिपाठी (१३) यांना झटपट बाद केले.


दिल्लीच्या संघात दोन बदल. पृथ्वी शॉ आणि डॅनियल सॅम्स आऊट; अजिंक्य रहाणे आणि एन्रिच नॉर्खिया इन.


दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय.


आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होत आहे.