Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा KKR विजयाने पंजाबच्या अडचणी वाढल्या; Play Off साठी सर्व सामने जिंकावे लागतील

KKR विजयाने पंजाबच्या अडचणी वाढल्या; Play Off साठी सर्व सामने जिंकावे लागतील

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 (IPL 2023) 53व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 5 विकेट्सने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये 8व्या स्थानावरून झेप घेत 5वे स्थान गाठले आहे. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याची संधी निर्माण झाील आहे, तर पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.

केकेआरने सोमवारी (8 मे) घरच्या मैदानावर शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना, रिंकू सिंगने लाँग लेगच्या दिशेने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे कोलकाता संघाने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांतील 6 पराभव आणि 5 विजयासह 10 गुण मिळवत 5वे स्थान गाठले आहे. केकेआरला आता राजस्थान, चेन्नई आणि लखनऊ विरुद्ध 3 सामने खेळायचे आहेत. जर केकेआरने तिन्ही सामने जिंकले आणि इतर संघांपेक्षा त्यांचा रनरेट असला तर ते प्लेऑफसाठी पार ठरू शकतात. पण त्याचवेळी एका पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले तर त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल आणि दोन सामने गमावल्यास त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागणार आहे.

- Advertisement -

पंजाबला सर्व सामने जिंकणे आवश्यक
कोलकाताविरुद्धच्या पराभवामुळे किंग्जच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांत 6 पराभव आणि 5 विजयासह 10 गुण असले तरी ते पॉईंट टेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहेत. पंजाबला पुढील 3 सामने खेळायचे असून यातील 2 सामने दिल्लीविरुद्ध आणि 1 सामना राजस्थानविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी तिन्ही सामने जिंकावे लागतील, तसेच रनरेट इतर संघापेक्षा चांगला ठेवावा लागेल. पण एक ही सामना गमावल्यास त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल आणि दोन किंवा तिन्ही सामने गमावल्यास पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.

गुजरात टायंट्सचे प्लेऑफचे स्थान जवळपास निश्चित
आयपीएलच्या 16 व्या हंगामात आता फक्त 17 सामने शिल्लक असतानाही प्लेऑफमध्ये कोणताही संघ प्रवेश करू शकला नाही आहे. त्यामुळे प्लेऑफमधील अव्वल 4 संघामध्ये कोणता संघ पात्र ठरेल आणि कोण बाहेर पडेल हे पाहावे लागले. पण गुजरात टायंट्स जवळपास प्लेऑफमध्ये पोहचल्याचे निश्चित आहे, कारण गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यातील 8 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे गुजरात संघ 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर लखनऊ सुपर जायंट्स 11 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -