क्विंटन डी कॉक आणि लोकेश राहुलने रचला इतिहास; 20 षटकात केल्या ‘इतक्या’ धावा

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि लोकेश राहुलने अनोखा इतिहास रचला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि लोकेश राहुलने अनोखा इतिहास रचला आहे. प्ले ऑफसाठीच्या लढतीत लखनऊच्या सलामीवीरांनी संपूर्ण 20 षटके खेळून त्यांनी विक्रमांची नोंद केली. क्विंटनने 70 चेंडूंत 10 चौकार व 10 षटकारांसह 140 धावांसह नाबाद राहिला. तसंच, लोकेश राहुल 51 चेंडूत 68 धावांवर नाबाद राहिला. संपूर्ण 20 षटके खेळत कोलकातासमोर 210 धावांचे आव्हान उभे केले आहे.

लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक या जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात क्विंटन डिकॉकला 12 धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर डिकॉकने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तसंच, या सामन्यात डिकॉकने शतकी खेळी करत आयपीएलमधील दुसरे शतक झळकाले.

लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी गोलंदाजी करताना कोलकाताचा पदार्पणवीर अभिजित तोमर याने तिसऱ्या षटकात 12 धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. 10व्या षटकात टीम साऊदीला षटकार खेचून लोकेशने यंदाच्या पर्वातही 500 धावांचा टप्पा ओलांडला.

आयपीएलमध्ये सलग पाचव्या पर्वात त्याने हा पराक्रम केला. क्विंटननं 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 वेळा पन्नासहुन अधिक धावा करण्याचा विक्रम क्विंटनने आपल्या नावावर केला आहे. लोकेश राहुलने 30 अर्धशतके व 4 शतके झळकावली आहेत.

या दोघांनी शतकी भागीदारी केली. परंतु, आयपीएल 2022मधील पहिल्या विकेटसाठीची ही संथ शतकी भागीदारी ठरली. मात्र, कोलकाताविरुद्धची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटनने 59 चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्यात 6 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. या दोघांनी 200 धावांची भागीदारी करताना इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांचा 185 धावांचा विक्रम मोडला.


हेही वाचा – दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी मोठा बदल, राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक नसणार?