के एल राहुल आफ्रिका सीरिजमधून बाहेर, शेअर केली भावूक पोस्ट

या मालिकेसाठी बीसीसीआयने नियमित कर्णधार रोहित शर्माला आधीच विश्रांती दिली होती. याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे दिग्गज खेळाडूही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार नाहीत.

KL Rahul shared emotional post after out of Africa series
के एल राहुल आफ्रिका सीरिजमधून बाहेर, शेअर केली भावूक पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा सामना आफ्रिकेशी पाच टी-२० मालिकेमध्ये होणार आहे. देशांतर्गत सुरु होणाऱ्या या मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुलला बाहेर करण्यात आले आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुलला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. सीरिजमधून बाहेर झाल्यामुळे के एल राहुलने भावूक पोस्ट शेअर केली आहे.

भारती संघाचा कर्णधार के एल राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे स्वीकारणे खूप कठीण आहे. परंतु आजपासून मी आणखी एक आव्हान सुरु करत आहे. पहिल्यांदा घरच्या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार होऊ न शकल्याने खूप निराश झालो. मात्र माझ्या संघातील मुलांना बाहेरून माझा पूर्ण पाठिंबा असेल. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ऋषभ पंत आणि उर्वरित संघाला टी २० मालिकेसाठी शुभेच्छा.

बीसीसीआयने के एल राहुलला बाहेर करण्यामागचे कारण सांगितले आहे. के एल राहुलला उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. तर कुलदीप यादवला नेट सरावात फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाली आहे. अशा स्थितीमध्ये दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. निवड समितीने यष्टिरक्षक ऋषभ पंतची कर्णधार आणि हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदी नियुक्त केले आहे.

या मालिकेसाठी बीसीसीआयने नियमित कर्णधार रोहित शर्माला आधीच विश्रांती दिली होती. याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे दिग्गज खेळाडूही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार नाहीत.

मालिकेसाठी भारतीय संघ

ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवन कुमार, हरिभन पटेल आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.


हेही वाचा : ‘या’ गोलंदाजाची अॅक्शन पाहून होईल लगान चित्रपटाची आठवण; व्हिडीओ व्हायरल