घरक्रीडाअनुष्का-विराट माझ्यासाठी प्रेरणास्थान - के. एल. राहुल

अनुष्का-विराट माझ्यासाठी प्रेरणास्थान – के. एल. राहुल

Subscribe

विराट आणि अनुष्का के. एल. राहुल याचे प्रेरणास्थान बनले असल्याचे त्यांनी एका टॉक शोमध्ये सांगितले आहे. राहुलला त्याच्या कठीण परिस्थितीत विरुष्का यांनी कशी साथ दिली हे राहुलने सांगितले आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे भारताचा फलंदाज के. एल. शर्मा याने एका टॉक शोमध्ये सांगितले आहे. त्याबरोबर ‘विरुष्काने मला माझ्या वाईट काळात देखील साथ दिली असून ते मला नेहमीच प्रेरीत करत असल्याचे राहुल म्हणाला आहे.

विरुष्काने कशी दिली राहुलला साथ?

ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्नमध्ये झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात के. एल. राहुल याला अपयश आले होते. या अपयशानंतर राहुल पूर्णपणे खचला होता. त्याला आलेल्या अपयशातून बाहेर काढण्यासाठी विरुष्काने मदत केली. तो नाराज झाल्याचे पाहून अनुष्का आणि विराटने राहुलला समजावून सांगितले. त्याचबरोबर अनुष्का आणि विराटच्या बाबतीत घडलेले सर्व चढ उतार त्यांनी राहुलसोबत शेअर केले. ते ऐकल्यानंतर अखेर राहुलला त्यांचे म्हणणे पटले आणि राहुल अपयशातून बाहेर पडला आणि त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने खेळण्याचे ठरवले. या घटनेनंतर विरुष्का आपले प्रेरणास्थान बनल्याचे सांगत त्यांनी अनुष्का आणि विराट यांची स्तुती केली.

- Advertisement -

विरुष्का विषयीचे राहुलचे मत

विराट आणि अनुष्का हे एक उत्तम आणि माझ्यासाठी प्रेरणादायी जोडप ठरले आहे. त्यांच्या आयुष्यात झालेल्या चढा ओढीत त्यांनी एकमेकांना समजून घेत उत्तम साथ दिली असून ते आनंदाने आयुष्य जगत असल्याचे राहुलने म्हटले आहे.

सोशल मीडियावर बातम्या शेअर करणे टाळा

सोशल मीडियावर के. एल. राहुल चांगलाच लोकप्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही बातमी शेअर करु नका असे कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रमैत्रिणींना राहुलने सांगितले आहे. सोशल मीडियावर एखादी बातमी टाकली तर ती बातमी सोशल माीडियावर चांगलीच गाजते. त्यामुळे खेळताना प्रचंड तणाव येतो आणि त्याचा खेळावर परिणाम होत असल्याचे मत राहुलने व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -