Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIPL 2025 Schedule : मुंबईचा पहिला सामना चेन्नईसोबत, वानखेडेवर किती? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IPL 2025 Schedule : मुंबईचा पहिला सामना चेन्नईसोबत, वानखेडेवर किती? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025 Schedule Announced) 18 व्या हंगामाचे बिगुल वाजले असून सर्व सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना पुढील महिन्यात 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. 18 व्या हंगामाला सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळणार आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025 Schedule Announced) 18 व्या हंगामाचे बिगुल वाजले असून सर्व सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना पुढील महिन्यात 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल, तर 18 व्या हंगामाचा अंतिम सामनाही 25 मे रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात येणार आहेत. मात्र सर्वांना उत्सुकता आहे ती मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची. चला तर मग जाणून घेऊया मुंबई इंडियन्सचे सामने कधी होणार आहेत. (Know the complete schedule of Mumbai Indians in IPL 2025)

आयपीएल 2025 चे वेळापत्रक आज (16 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2025 मध्ये 13 शहरांमध्ये 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जातील. लखनऊ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे सर्व सामने खेळवले जातील. 18 व्या हंगामाला सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर फक्त दोन सामने सलग खेळणार आहे. कारण त्यांना संपूर्ण हंगामात प्रत्येक सामन्यानंतर इतर राज्यात प्रवास करावा लागणार आहे. संघाचा शेवटचा लीग सामना 15 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.

हेही वाचा – IPL 2025 Schedule Announced : आरसीबी-केकेआरमध्ये पहिला सामना, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक

  • 23 मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, चेन्नई
  • 29 मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद
  • 31 मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकात नाईट रायडर्स, मुंबई
  • 4 एप्रिल, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, लखनऊ
  • 7 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई
  • 13 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली
  • 17 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, मुंबई
  • 20 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई
  • 23 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, हैदराबाद
  • 27 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई
  • 1 मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, जयपूर
  • 6 मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई
  • 11 मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, धर्मशाळा
  • 15 मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबईत

हेही वाचा – Champions Trophy 2025 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयसीसीकडून अतिरिक्त तिकीट विक्रीची घोषणा