Homeक्रीडाChampions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन ट्रॉफी 2025 सामन्यांच्या तिकीटांचे दर जाहीर केले आहेत. कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या 10 सामन्यांच्या तिकिटांची विक्रीला सुरूवात झाली आहे. यानंतर आता आयसीसीने भारतीय संघाच्या सर्व सामन्यांच्या तिकीटांचे दर जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली : येत्य 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार, चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार असून 20 फेब्रुवारीपासून स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन ट्रॉफी 2025 सामन्यांच्या तिकीटांचे दर जाहीर केले आहेत. कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या 10 सामन्यांच्या तिकिटांची विक्रीला सुरूवात झाली आहे. यानंतर आता आयसीसीने भारतीय संघाच्या सर्व सामन्यांच्या तिकीटांचे दर जाहीर केले आहेत. (Know the ticket prices for the India-Pakistan match in the Champions Trophy 2025)

भारतीय संघाच्या सर्व सामन्यांची तिकिटे कधी आणि कोणत्या किमतीत उपलब्ध होतील हे आयसीसीने जाहीर केले आहे. दुबईमध्ये होणाऱ्या भारतीय संघाच्या ग्रुप सामन्यांसाठी तिकिटांची विक्री आजपासून (3 फेब्रुवारी) सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता या विक्रीला सुरुवात झाली असून भारतीय संघाचे तिन्ही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांच्या तिकिटांची किंमत 125 AED म्हणजेच संयुक्त अरब अमिराती दिरहमपासून सुरू होईल. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत 2900 रुपये आहे. तिकिटे ऑनलाइन आणि थेट दुबई स्टेडियममध्ये असलेल्या ‘तिकीट कलेक्शन सेंटर’वरून भारतीय चाहत्यांना खरेदी करता येणर आहेत. ऑनलाइन तिकिटे खरेदी करण्यासाठी https://www.iccchampionstrophy.com/tickets या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि पसंतीनुसार कोणत्याही किमतीत तिकीट खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक शर्माच्या षटकारांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराची बोलती बंद, काय म्हणाला?

23 फेब्रुवारी रोजी महामुकाबला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या वेळी 2024 च्या टी-20 विश्वचषकात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर मोहम्मद रिझवान पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर, भारतीय संघ 3 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळेल.

हेही वाचा – Shivraj Rakshe : ‘शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटींचे बक्षीस देणार,’ कोणी दिले आव्हान?

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन्ही संघ

  • भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
  • पाकिस्तान – मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आघा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, उस्मान खान (यष्टिरक्षक), अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.