घरक्रीडाकोहली, पंत, कुलदीप आशिया इलेव्हन संघात

कोहली, पंत, कुलदीप आशिया इलेव्हन संघात

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली, युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत यांच्यासह सहा भारतीय क्रिकेटपटूंची वर्ल्ड इलेव्हन संघाविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आशिया इलेव्हन संघात निवड झाली आहे. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) या सामन्यांचे आयोजन केले आहे. हे सामने १८ ते २२ मार्च या कालावधीत पार पडतील. कोहलीची आशिया इलेव्हन संघात केवळ एका सामन्यासाठी निवड झाली आहे, पण त्याची उपलब्धता बीसीसीआयने स्पष्ट केलेली नाही.

बीसीबीच्या वेबसाईटनुसार बीसीबीचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी आशिया इलेव्हन संघाची घोषणा केली. या संघात कोहली, पंत, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव या सहा भारतीयांचा समावेश होता. तसेच मुस्ताफिझूर रहमान, तमिम इक्बाल, मुशफिकूर रहीम आणि लिटन दास या चार बांगलादेशी खेळाडूंची संघात निवड करण्यात आली. पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र संघात स्थान मिळाले नाही. दुसरीकडे फॅफ डू प्लेसिस वर्ल्ड इलेव्हन संघाचे नेतृत्व करणार असून या संघात क्रिस गेल, किरॉन पोलार्ड, जॉनी बेअरस्टो यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

आशिया इलेव्हन संघ : विराट कोहली, रिषभ पंत, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मुस्ताफिझूर रहमान, तमिम इक्बाल, मुशफिकूर रहीम, लिटन दास, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, राशिद खान, मुजीब उर रहमान, संदीप लामीचाने.

वर्ल्ड इलेव्हन संघ : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), क्रिस गेल, अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, ब्रँडन टेलर, शेल्डन कॉट्रेल, लुंगी इंगिडी, अँड्र्यू टाय, मिचेल मॅक्लॅनघन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -