घरक्रीडाIPL 2021 : KKR ची अनोखी कामगिरी! मुंबई इंडियन्स, चेन्नईच्या यादीत स्थान

IPL 2021 : KKR ची अनोखी कामगिरी! मुंबई इंडियन्स, चेन्नईच्या यादीत स्थान

Subscribe

यंदा आपल्या पहिल्या सामन्यात केकेआरने हैदराबादला पराभूत केले. 

आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायजर्स हैदराबादला (SRH) पराभूत केले. केकेआरने हा सामना १० धावांनी जिंकला. हा केकेआरचा आयपीएल स्पर्धेतील १०० वा विजय ठरला. ही कामगिरी करणारा केकेआर या स्पर्धेतील तिसरा संघ ठरला. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी ही कामगिरी केली आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८७ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून नितीश राणा (८०) आणि राहुल त्रिपाठी (५३) यांनी चांगली फलंदाजी केली. १८८ धावांचा पाठलाग करताना मनीष पांडे (नाबाद ६१) आणि जॉनी बेअरस्टो (५५) यांनी हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना २० षटकांत ५ बाद १७७ धावाच करता आल्या.

मुंबई इंडियन्स अव्वल

आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ तीन संघांना १०० किंवा त्याहून जास्त सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत २०५ पैकी ११८ सामने जिंकले असून ८३ सामने गमावले आहेत. मुंबई हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी एकूण पाच वेळा ही स्पर्धा जिंकली.

- Advertisement -

केकेआरला यादीत स्थान

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नईने आतापर्यंत १८१ पैकी १०६ सामने जिंकले आहेत. आता कोलकाताने या यादीत स्थान मिळवले आहे. कोलकाताने १९७ सामन्यांत १०० विजय पूर्ण केले असून त्यांनी ९० सामने गमावले आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -